टोकाच्या संघर्षानंतर मनोमिलन? बाळासाहेब थोरात बाजूला, नाना पटोले म्हणतात…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

टोकाच्या संघर्षानंतर मनोमिलन? बाळासाहेब थोरात बाजूला, नाना पटोले म्हणतात...
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 6:00 PM

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी उत्तर दिलं.

विशेष म्हणजे अतिशय हसत-खेळत आणि उत्साहाच्या वातावरणात ही पत्रकार परिषद पार पडली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा पाडण्यात यश आल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं का?

मी सुरवातीलाच प्रश्न उपस्थित केला होता. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षात कुठेही कुठलाही वाद नाही. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं. त्याचं मी सुरवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून सुतोवाच केलेलं होतं की आमच्यात कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

बाळासाहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की आमच्यात कुठलाही वाद नाही. पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण हा प्रयत्न फोल ठरला आहे. आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही जिंकू, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी केला.

जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे मी कार्यकारिणी बरखास्त केली. कारण जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त करावीच लागते, असं पटोले यांनी यावेळी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाला. एच. के. पाटील पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांच्या घरी गेले. ते सर्वच नेत्यांना भेटले. पण त्यांचा अपघात झाल्याने ते त्यांच्या घरी जाऊन भेटले. तुम्ही समज केला की ते बाळासाहेबांची मनधरणी करायला गेले. आता त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून भेटायला गेले. मी हेच सांगू इच्छितो की, काहीच वादविवाद नाही, असं पटोलेंनी स्पष्ट केलं.

यावेळी पत्रकारांनी पटोले यांना थोरातांच्या राजीनाम्याविषयी आणि नाराजीच्या पत्राविषयी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरातांनी नाराजीचं पत्र पाठवलं तर त्या पत्राची एक कॉपी तरी दाखवा. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र तर दाखवा, असं उत्तर दिलं.

यावेळी बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा अध्यक्षांनी चर्चा राष्ट्रीय पातळीवर नेली. तुम्ही खाली कशाला नेता? असं म्हणत बोलणं टाळलं.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.