महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास तुम्हीच जबाबदार आहात का? नाना पटोले आता स्पष्टच म्हणाले….

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आमचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे अनेक नेते मंत्री झाले. मग माझ्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास तुम्हीच जबाबदार आहात का? नाना पटोले आता स्पष्टच म्हणाले....
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 5:19 PM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प‘ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भूमिका मांडली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर मविआ सरकार कोसळलं नसतं असं महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटतंय. मविआ नेत्यांच्या या मतावर नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. याशिवाय नाना पटोले यांना यावेळी महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर का टीका करतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी भूमिका मांडली.

“मी माझे मित्र संजय राऊत यांचे परवाच आभार व्यक्त केले की, त्यांनी माझ्या शक्तीची जाणीव मला करुन दिली. जसं रामायणात हनुमान यांना संजीवनी आणायची जबाबदारी आली तेव्हा ते थेट पाहाड उचलून आले होते. संजय राऊतांनी देखील मला माझ्या शक्तीची जाणीव करुन दिली. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले”, असं नाना पटोले मिश्किलपणे म्हणाले.

नाना पटोले काय-काय म्हणाले?

खरंतर महाविकास आघाडी सरकार हे एका विचित्र परिस्थितीत निर्माण झालं हे मी आजच नाही तर आधीसुद्धा सांगितलंय. पहाटेचं सरकार पडल्यानंतर जी काही परिस्थिती झाली आणि आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की, महाराष्ट्राच्या जनतेवर पुन्हा निवडणुका येऊ नये म्हणून भूमिका घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली.

या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आमचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे अनेक नेते मंत्री झाले. मग माझ्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली.

मी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने कायद्यानुसार पुढे घेऊन जात होतो. पण त्याचवेळी हायकमांडला वाटलं की संघटना कुठेतरी कमी पडतेय. त्यामुळे हायकमांडने राजीनामा द्यायला सांगितला. हायकमांडच्या आदेशानंतर मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर जे काही खोक्याचं सरकार आलं, जी काही स्थिती झाली ते पूर्ण राज्याने पाहिलं. पण मी अध्यक्षपदी राहिलो असतो तर सरकार वाचलं असतं हे आमच्या संजय राऊतांनी सांगण माझ्यासाठी अभिमानास्पदच आहे.

राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वतीने अजित पवार किंवा जयंत पाटील यांना मुख्यमंत्री ठेवायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा जो अधिकार आहे तो त्यांनी वापरला. शरद पवार यांनी भूमिका मांडली. पण शरद पवारांनी सुद्धा माझी शक्ती ओळखली त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो.

मला खंत म्हणायचं काही कारण नाही. मी माझ्या नेत्याचा आदेश पाळला त्यालाच मी माझा स्वाभिमान मानतो. कारण ज्यावेळेस राजीनामा द्यायचा होता तेव्हा उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना भेटा आणि राजीनाम्याचं सांगा, असं सांगा मग राजीनामा द्या, असं सांगितलं होतं. मी त्यानुसार त्यांना सांगून राजीनामा दिला.

मविआत राहून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटावर का टीका करता?

मी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ठाकरे गट यांच्यावर कुठे टीका केली? तुम्ही अर्थाचा अनर्थ लावता. मी आता संजय राऊत यांचं कौतुक केलं. महाविकास आघाडीत बिघाडी असं तुम्हाला का वाटतं? ते कळत नाही. भाजपचं काहीच कुणाला दिसत नाही. आता मी तुमच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मुंबईत आले की काही जणांना अॅसिडीटी होते. आता त्यांनी मला वाक्य दिलं. पंतप्रधान दोनदा आले. नरेंद्र मोदी मुंबईत आल्यावर मुंबईकरांचे बेहाल होतात का? असं तुम्ही मुंबईकरांना विचारलं का?

आम्ही नरेंद्र मोदी यांचं स्वागतच करतो. आम्हाला आनंदच होतो. पण यानिमित्ताने मुंबईकरांचे बेहाल होतात. त्याची काळजी कुणी घ्यावी? मुंबईकरांना अॅसिडिटी होते म्हणणं. मुख्यमंत्र्यांचं म्हणण्याकडे बघाना

पुण्यातही ट्रॅफिक जाम होते. तिथे देखील व्हिआयपी पोहोचतात. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होतात. माजी आमदारांना सेक्युरिटी आहे. जनतेचा बेहाल करायला तुम्हाला सत्तेत बसवलो? असा प्रश्न विचारला तर त्यांना त्रास होतो. पण अखेर मी लोकप्रतिनिधी आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. जनतेच्या भावना, दु:ख मांडणं माझं काम आहे.

पंतप्रधान संसदेत छाती ठोकून भाषण देत होते. मी एवढ्या वर्षात कोणत्या पंतप्रदानाला असं छाती ठोकून भाषण करताना पाहिलं नाही. एक दर्जा असतो. देशाच्या पंतप्रधानांचं भाषण फक्त देशातील लोकं बघतात असं नाही. जागितक पातळीवर याची नोंद घेतली जाते. पण ज्या पद्धतीने चाललं आहे त्यावर बोललो तर नाना पटोले नरेंद्र मोदींवर टीका करतात बोलतात. मी त्यांचा विरोध करत नाही. त्यांनी माझे झाड डुबवले नाही. या देशाच्या लोकशाहीचं महत्त्व जागतिक पातळीवर आहे.

राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्याबद्दल भूमिका मांडली. एलआयसी आणि एसबीआयमधून चुकीचे कागदपत्रे दाखवून पैसे काढण्यात आले. एलआयसीमध्ये सर्वसामान्यांचे पैसे आहेत. उद्या एलआयसीने हात वरती केले.

नाना पटोले बोलतो पण बाकीचे लोकं बोलत नाहीत, असं काही लोकं बोलतात. माझा स्वभाव आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. मी सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे. मी महाविद्यालयीन काळापासून चांगलं करावं, असे माझे विचार होते. म्हणून मी बोलतोय. मोदी विद्वान आहेतच. पण राहुल आणि त्यांचा एकदा डिबेट होऊद्याना.

आम्ही काही साम-दाम-दंड भेद करत नाही. भाजपने आमच्यासाठी अशी व्यवस्था केलीय की महाराष्ट्राची अस्मिता संपवण्याचं काम केलं जातंय. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लोकांमध्ये भयंकर चीड आहे. महागाई कृत्रिम आहे. आम्ही जनतेला राजा समजणारी लोकं आहोत. ते लोकांना राजा समजतात.

‘नाना पटोले कधी मॅच फिक्सिंगमध्ये फसला नाही’

नाना पटोले कधी मॅच फिक्सिंगमध्ये फसला नाही. नाना पटोलेची लढाई कधीही समोरची राहील. मला मॅच फिक्सिंग कधी जमली नाही. आणि करणारही नाही. जे करायला सांगतात ते इथे सांगणार नाही. जे काही झालं ते फार वाईट झालं. नागपूरची निवडणुकीतला विजय हा काँग्रेस आणि मविआचा विजय आहे.

कुणाचही खोटी प्रशंसा करणं मला पटत नाही. मी गांधी कुटुंबाला जवळून पाहिलं. त्यांनी काश्मीर चालायचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी थट्टा केला. या थट्टेत त्यांनी प्रवास सुरु केला तेव्हा ऊन, थंडीमध्ये यात्रा केली.

पक्षातही हात जोडो सुरुय. आमच्या नेत्यांमध्ये ती कॉलिटी आहे. ते माझ्यावर प्रेम करतात त्यावर वाईट वाटायचं कारण नाही. मी काही कुणाला सांगितलं नाही की माझ्यावर प्रेम करा. मी राहुल गांधी यांना प्रेमपत्र लिहिलं नाही.

रिझल्ट ऑरियन्टेड राहावंच लागेल. तुम्हाला रिझल्ट द्यायचं नसेल आणि कुलूप लावा म्हणायचं असेल तर मी खुर्चीवर बसणार नाही. मी ज्यादिवशी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनलो तेव्हा काँग्रेसला राज्यात एक नंबर करेन, अशी शपथ घेतली होती. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस आता दोन नंबरवर आलीय.

महाराष्ट्रात काँग्रेस पुढच्या काळात एक नंबरचाच पक्ष राहील. मी मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष एक नंबरला आणण्याचा प्रयत्न करतोय असं नाही. शेवटी हायकमांडच्या निर्णयाला मान्यता देण्यातं काम माझं आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.