आरक्षणाचं आश्वासन देऊन भाजपनं धनगर समाजाला फसवलं : नाना पटोले

भारतीय जनता पक्षाने 5 वर्षे राज्यात सत्ता भोगली, पण आरक्षण काही दिलं नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

आरक्षणाचं आश्वासन देऊन भाजपनं धनगर समाजाला फसवलं : नाना पटोले
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 7:07 PM

मुंबई : “धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे. काही लोकांनी प्रलोभनं दाखवून या समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला, पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने 5 वर्षे राज्यात सत्ता भोगली, पण आरक्षण काही दिलं नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते इस्लाम जिमखाना येथे धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते (Nana Patole criticize BJP RSS over Dhangar reservation).

नाना पटोले म्हणाले, “धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. 5 वर्षे राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार होते. असं असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.”

आता धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी, असं आवाहन करून नाना पटोले यांनी सन्मानाची वागणूक आणि समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन दिलं.

“हा आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात ऐकत कोणाचेच नाहीत. ते फक्त नागपूरचं ऐकतात. मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या. त्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा हा डाव आहे,” असाही आरोप नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले, “धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत काँग्रेस पक्ष सकारात्मक आहे. धनगर समाजातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात सन्मान दिला जाईल.” यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक,  देवानंद पवार, अलकाताई गोडे, हरिभाऊ शेळके, ॲड. संदिपान नरोटे आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असलेलं घोंगडं व काठी देऊन नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :

डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करा; नाना पटोले यांची मागणी

आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली

काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे; नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीला आठवण!

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize BJP RSS over Dhangar reservation

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.