नाना फक्त प्रदेशाध्यच रहाणार? राऊतांचं मंत्रीपदही शाबूत? विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत?

पटोले आणि राऊत यांच्या खांदेपाटल होतेय अशीही चर्चा आहे. पण आता नव्या चर्चेनं आणि नावानं यात ट्विस्ट निर्माण झालं आहे.

नाना फक्त प्रदेशाध्यच रहाणार? राऊतांचं मंत्रीपदही शाबूत? विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत?
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 10:24 AM

मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी (Nana Patole Nitin Raut And Sangram Thopate) सोनिया गांधी यांची एकत्र भेट घेतल्यानंतर अनेक शक्यतांची चर्चा सुरु झाली. त्यात पटोले आणि राऊत यांच्या खांदेपाटल होतेय अशीही चर्चा आहे. पण आता नव्या चर्चेनं आणि नावानं यात ट्विस्ट निर्माण झालं आहे (Nana Patole Nitin Raut And Sangram Thopate).

संग्राम थोपटे विधानसभा सभापती होणार?

नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कोण अध्यक्ष होणार याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाणांपासून ते के.सी.पाडवी यांच्या नावापर्यंत चर्चा झाली. त्यातच आता आणखी एक नाव समोर येतं आहे. हे आहेत काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे. विधानसभा सभापती म्हणून काँग्रेस थोपटेंवर विश्वास दाखवू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या काँग्रेसमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट दिसतात. त्यात थोपटे सभापती झाले तर विदर्भाला मिळालेला मान पुन्हा प. महाराष्ट्रात आलेला दिसणार.

कोण आहेत संग्राम थोपटे?

उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला आणि ऐन नव्या वर्षाच्या तोंडावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या ऑफिसवर हल्ला केला. जोरदार तोडफोड केली. दगडफेक केली. थोपटेंना मंत्री केलं नाही म्हणून कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं सांगितलं गेलं. हे कार्यकर्ते थोपटेंचे कार्यकर्ते होते असाही दावा खुद्द कार्यकर्त्यांनी केला. अर्थातच दुसऱ्या दिवशी थोपटेंनी तोडफोडीची पहाणी केली. कार्यकर्ते त्यांचं नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावेळेस थोपटेंची चर्चा राज्यभरात झाली. आताही त्यांचं नाव सभापतीपदासाठी समोर येतंय ते कदाचित त्यांची मंत्रिपद हुकलं म्हणूनही असेल. पण काँग्रेस भवनच्याच तेही पुण्यासारख्या ऐतिहासिक ठिकाणच्या तोडफोडीत नाव आलेल्या नेत्याला विधानसभा सभापती केलं जाणार का हाही चर्चेचाच विषय आहे (Nana Patole Nitin Raut And Sangram Thopate).

मग पटोले फक्त प्रदेशाध्यक्षच?

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होणारच होते. ते झालेही पण त्यांनी सोबत मंत्रीपदाचीही मागणी केली आणि काँग्रेसमध्येच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. आताही पटोलेंना मंत्रीपद मिळणार की नाही याची चर्चाच सुरु आहे. राऊत, पटोले एकत्र सोनियांना भेटले म्हणून राऊतांचं ऊर्जा खातं पटोलेंना मिळणार अशीही चर्चा सुरु आहे. पण आता थोपटेंच्या नावामुळे पटोले फक्त प्रदेशाध्यक्षच रहातील आणि त्यांनी पक्षविस्तारासाठी पूर्ण वेळ द्यावा असं काँग्रेस हायकमांडला अपेक्षीत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यातच राऊत ऊर्जा खातं सहज सोडतील अशी शक्यताही कमी आहे. पटोलेंसाठी ऊर्जा खातं सोडलं तर मग राऊत सभापती होणार का? अशीही काँग्रेस गोटात चर्चा रंगली आहे.

Nana Patole Nitin Raut And Sangram Thopate

संबंधित बातम्या :

‘कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, शिवसेना समोरच्याला संपवेल’, उदय सामंतांचं भाजपला उत्तर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात लढणा

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.