शरद पवार म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून राजीनामा, नाना पटोले म्हणतात….

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे (Nana Patole on Sharad Pawar statement).

शरद पवार म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून राजीनामा, नाना पटोले म्हणतात....

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे नाना पटोले यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागत असल्याचं शरद पवार म्हणाले. या वक्तव्याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं (Nana Patole on Sharad Pawar statement).

“शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केलं आहे, महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांनी मिळून झालं आहे. किमान समान कार्यक्रमातून हे सरकार स्थापन झालं. त्यानुसार वर्षभरात कामंही झाली”, असं नाना पटोले म्हणाले (Nana Patole on Sharad Pawar statement).

“अध्यक्षपदाबाबत जी काही चर्चा सुरु असेल. मात्र, या पदाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसून योग्य निर्णय घेतील. याबाबत कोणतही दुमत नाही”, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

“पक्षश्रेष्ठींना मला विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एक वर्ष मी अध्यक्षपदाच्या खुर्चीचा वापर जनतेला न्याय देण्यासाठी केला. त्याचाच आनंद आज माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. नवे अध्यक्ष कोण असणार याबाबत मला कोणतीही सूचना किंवा माहिती मिळालेली नाही”, असं त्यांनी सांगितलं.

“पक्ष काय जबाबदारी देईल ते माहिती नाही. मोदी सरकारने तीन काळे कायदे आणले. या कायद्याविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी थंडीमध्ये आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान जे स्वत:ला जनतेचे चौकीदार म्हणतात त्यांनी देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेला आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या व्यवस्थेला या लोकशाहीच्या मार्गानेच उद्ध्वस्त करु”, असं नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या : 

नाना पटोलेंनी राजीनामा दिला; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?

‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ म्हणणारा आमदार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Published On - 6:42 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI