नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या दिशेने, रुग्णवाढ कायम

वी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नवी मुंबईत काल 191 कोरोना रुग्ण सापडले होते. (Navi Mumbai Corona Hotspot)

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या दिशेने, रुग्णवाढ कायम
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 9:19 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत आज नव्या 169 कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या पाच दिवसांपासून नवी मुंबईत दररोज 100 हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 हजार 903 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नवी मुंबईत काल 191 कोरोना रुग्ण सापडले होते. (Navi Mumbai Corona Hotspot)

त्यातच दोन दिवसांपूर्वी वाशी येथील कोरोनाबधित रुग्णांना नवीन हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात येत होते. त्यातील एक रुग्ण रुग्णवाहिकेतून पळून गेला होता. त्यानंतर पळालेल्या रुग्णाला शोधून परत आणले. मनपाच्या कोविड रुग्णालयातून नवीन रुग्णालयात शिफ्ट करताना हा प्रकार घडला होता.

आजच्या 169 रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 हजार 903 पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे आज 4 कोरोनाबळी गेले. नवी मुंबईकरांसाठी ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.

नवी मुंबईतील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि ऐरोली ही चार ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट बनले आहेत. या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहे. सततच्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईतील 118 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

आज नवी मुंबईत कुठे किती नवे रुग्ण?

बेलापूर – 9 नेरुळ – 22 वाशी – 17 तुर्भे – 25 कोपरखैरणे – 23 घणसोली – 24 ऐरोली – 46 दिघा – 3

तर आज एका दिवसात 54 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 240 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत सध्या 1 हजार 545 रुग्ण उपचार घेत आहेत. (Navi Mumbai Corona Hotspot)

संबंधित बातम्या : 

बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल

सोलापुरात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कोरोनाने मृत्यू

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.