धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, बलात्काराच्या आरोपानंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे

राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या नेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही निलेश राणे यांनी सांगितले. | Nilesh rane

धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, बलात्काराच्या आरोपानंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे
भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

मुंबई: धनंजय मुंडे हे टोकाचे निर्लज्ज असल्यामुळे बलात्काराचे आरोप होऊनही त्यांनी राजीनामा दिला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. महाविकास आघाडीतील नेते नुसते राजीनामा देऊन सुटता कामा नये. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी या नेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही निलेश राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane slams NCP leader Dhanajay Munde)

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड यांनी राजीनामा देऊन मेहरबानी केली नाही, असे म्हटले. त्यांना राजीनामा हा द्यावा लागणारच होता. आता त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे निलेश राणे यांनी म्हटले.

विरोधी पक्षांच्या दबावामुळे संजय राठोडांचा राजीनामा

विरोधी पक्षाने एक दबाव निर्माण केला, त्यातून हा राजीनामा दिला गेला आहे. हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलंय. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी, असं निलेश राणे म्हणाले.

भाजपच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणात धमक्या आल्या. परंतु मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्र यांचा बापाचा नाहीय एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रामधून जाणार आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

‘संजय राठोडांना बंजारा समाजाचा पाठिंबा नाही, आपल्या गटाच्या काही लोकांकडून ते हवं ते वदवून घेतायत’

(Nitesh Rane slams NCP leader Dhanajay Munde)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI