सुशांतसिंग प्रकरण अजूनही महाराष्ट्र सरकारच्या जिव्हारी?; मलिक म्हणतात तो तर बदनामीचा कट!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. (ncp leader nawab malik criticized bjp over Sushant Singh case)

सुशांतसिंग प्रकरण अजूनही महाराष्ट्र सरकारच्या जिव्हारी?; मलिक म्हणतात तो तर बदनामीचा कट!
सुशांत सिंह राजपूत

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा आरोप वाब मलिक यांनी केला आहे. (ncp leader nawab malik criticized bjp over Sushant Singh case)

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही, असे मलिक म्हणाले. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतप्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप नेते मोदींचंही ऐकत नाही

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत हे सिद्ध होत असून हे जनहितासाठी की मतासाठी आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत या दुटप्पी भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (ncp leader nawab malik criticized bjp over Sushant Singh case)

संबंधित बातम्या:

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!

(ncp leader nawab malik criticized bjp over Sushant Singh case)

Published On - 12:45 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI