AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेआठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी पूर्ण झाली आहे. रोहित पवार यांची जवळपास साडेआठ तास चौकशी करण्यात आली.

साडेआठ तासांच्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 01, 2024 | 9:37 PM
Share

मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी पूर्ण झाली आहे. रोहित पवार यांची जवळपास साडेआठ तास चौकशी करण्यात आली. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणावर ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीने याआधी रोहित पवारांची 24 जानेवारीला 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार ते आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले. ईडी अधिकाऱ्यांच्या आजच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं. यावेळी रोहित पवार यांना कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

“देशात आणि महाराष्ट्रात जे काही चुकीचं चालू आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही प्रयत्न होतोय त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. मी विनंती करतो की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं”, असं रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

“मी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंत काही लोकांनी सांगितलं की, राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पदाधिकारी, नागरीक, कार्यकर्त्यांनी, काही लोकांचं तर राजकारणाशी काही देणंघेणं नव्हतं अशा लोकांनी लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही, त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यावर कारवाई होत असेल, तर ते जिल्ह्यांमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले, कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला”, असं रोहित पवार म्हणाले.

‘सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोय, पण…’

“आता चौकशी सुरु आहे, त्या चौकशीकडे बघून असंच म्हणावं लागेल की, या मुंबई शहरामध्ये कुणीतरी सोन्याचा हंडा लपवला असंच सांगितलंय. त्यामुळे या कोपऱ्यात जा, त्या कोपऱ्यात जा, काहीही कर, जे विचारायचं ते विचार पण हा लपलेला कथित हंडा कुठे आहे हे शोधण्याचं काम काही लोकांकडे केलं जात आहे. पण मी एकच सांगतो, व्यवसायात मी आधी आलो आणि नंतर राजकारणात आलो आहे. आम्ही विचारांसाठी लढत आहोत. राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना वाटत असेल की आम्ही घाबरलो आहोत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, याआधी जे घाबरले ते पळून गेले सर्वांनी बघितलं आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

“खासदार सुप्रिया सुळे आज बजेटचा दिवस असल्यामुळे लोकसभेला गेल्या आहेत. सुप्रिया ताई महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुद्दे मांडत आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील लोकसभेत आपली जाबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा राष्ट्राला व्हावा म्हणून शरद पवार हे राज्यसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी बजावत आहेत. नाहीतर काही लोकं फक्त नावासाठी आमदार, खासदार बनतात. पण आपले खासदार राज्यसभेत आणि लोकसभेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. माझी पत्नी इथे आली आहे”, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण