AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boat ने 15 तासांच्या बॅटरी लाईफसह नवीन 80 वॅटचा ब्लूटूथ स्पीकर केला लाँच, जाणून घ्या किंमत

बोटने भारतात नवीन स्टोन 900 ब्लूटूथ स्पीकर लाँच केला आहे. यामध्ये 80 वॅट साउंड आउटपुट, आरजीबी लायटिंग, ब्लूटूथ 5.3 आणि 15 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. या स्पीकरला IPX5 रेटिंग देखील मिळाले आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्पीकरची किंमत जाणून घेऊयात.

Boat ने 15 तासांच्या बॅटरी लाईफसह नवीन 80 वॅटचा ब्लूटूथ स्पीकर केला लाँच, जाणून घ्या किंमत
| Edited By: | Updated on: Jul 07, 2026 | 5:45 PM
Share

बोटने भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवीन पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर स्टोन 900, सादर केला आहे. हा स्पीकर विशेषतः मोठा आवाज, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि घराबाहेर वापरण्यासाठी चांगला पर्याय शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्पीकर घरगुती पार्ट्या, प्रवास आणि सहल यांसारख्या ठिकाणी एक उत्कृष्ट ऑडिओ अनुभवा येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्पीकरची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

80 वॅट साउंडसह दमदार कामगिरी

Boat Stone 900 मध्ये 80 वॅटचा ऑडिओ आउटपुट आहे. ज्यामुळे हा स्पीकर मोठा आणि स्पष्ट आवाज देऊ शकतो. यात ड्युअल ड्रायव्हर्स आणि वेगळ ट्वीटर आहेत, जे म्युजिक, चित्रपट आणि इतर ऑडिओ फाइल्स ऐकताना उत्कृष्ट साउंड क्वॉलिटी देतात. जर तुम्ही मोठ्या आवाजाचा स्पीकर शोधत असाल, तर हे मॉडेल एक चांगला पर्याय असू शकतो.

म्युजिकनुसार लाईट्स होतील चेंज

या स्पीकरमध्ये RGB लायटिंगची सुविधा देखील आहे, जी गाण्याच्या तालाप्रमाणे रंग बदलतात. यामुळे पार्टीचे वातावरण आणखी चांगले होते.

पाण्यापासून सुरक्षित राहील

बोट स्टोन 900 ला IPX5 रेटिंग आहे. ज्यामुळे थोड्या ओलाव्यापासूनही सुरक्षित राहील. तथापि हा स्पीकर स्विमिंग पूलमध्ये किंवा पावसात वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी

या स्पीकरमध्ये ब्लूटूथ 5.3 आहे, ज्यामुळे तो स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपला सहजपणे जोडता येतो. यात AUX आणि USB चेही समर्थन आहे, ज्यामुळे गाणं ऐकण्यासाठी विविध पद्धती वापरता येतात.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा चार्ज केल्यावर स्पीकर अंदाजे 15 तास चालू शकतो. तथापि बॅटरी लाईफ, आवाज, आरजीबी लायटिंग आणि वापराच्या पद्धतींवर अवलंबून असेल.

किंमत आणि उपलब्धता

बोट स्टोन 900 या स्पीकरची किंमत 5 हजार 999 रूपये इतकी आहे. तथापि लाँच ऑफरचा भाग म्हणून ॲमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हा स्पीकर तुम्ही 4 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच हा स्पीकर ग्राफाइट ब्लॅक (Graphite Black)आणि जंगल टेरेन (Jungle Terrain)रंगांमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही हा‍ स्पीकर बोटच्या अधिकृत वेबसाइट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. जर तुम्ही कमी किमतीत एक हाय-पॉवर ब्लूटूथ स्पीकर शोधत असाल, तर बोट स्टोन 900 हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा दमदार आवाज, दीर्घ बॅटरी लाईफ आणि अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय या किमतीत त्याला आकर्षक बनवतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा