ऑगस्ट क्रांतीदिनापासून प्रदेश काँग्रेसची सर्व जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा; मंगळवारपासून सेवाग्राम आश्रम वर्धा येथून पदयात्रेचा शुभारंभ

स्वातंत्र्याच्या या गौरवशाली इतिहासाची आठवण या निमित्तीने केली जाणार असून नवीन पिढीला त्याची माहिती व्हावा यासाठी पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे. आझादी गौरव पदयात्रेत काँग्रेस नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत. या पदयात्रेत असंख्य संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे. 

ऑगस्ट क्रांतीदिनापासून प्रदेश काँग्रेसची सर्व जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा; मंगळवारपासून सेवाग्राम आश्रम वर्धा येथून पदयात्रेचा शुभारंभ
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:55 PM

मुंबईः देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Nectar festival of freedom) साजरा होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 75 किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी (Revolution Day) पदयात्रेचा प्रारंभ होत असून 14 तारखेला पदयात्रेचा समारोप होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) हे उद्या मंगळवारी सेवाग्राम येथून पदयात्रेचा शुभारंभ करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

तर बुधवार 10 रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शेगाव येथून पदयात्रेत सहभागी होतील, 11 रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत ते सहभागी होतील व 12 रोजी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

असा असणार प्रवास

तर दिनांक 13 रोजी नागपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभाग घेणार असून 14 तारखेला पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत आगा खान पॅलेस येथून सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होतील.

स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस पक्षाचे योगदान

स्वातंत्र चळवळीतील काँग्रेस पक्षाचे योगदान व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरु ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने दिलेले योगदान याची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला जाणार आहे.

नवीन पिढीला त्याची माहिती व्हावा

स्वातंत्र्याच्या या गौरवशाली इतिहासाची आठवण या निमित्तीने केली जाणार असून नवीन पिढीला त्याची माहिती व्हावा यासाठी पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे. आझादी गौरव पदयात्रेत काँग्रेस नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत. या पदयात्रेत असंख्य संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.