महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट, हाय ॲलर्ट जारी, अरबी समुद्राकडे टाँकटाइ वादळाची आगेकूच

अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा  हवामान विभागानं दिला आहे. New Cyclone toktoi Arabian Sea

महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट, हाय ॲलर्ट जारी, अरबी समुद्राकडे टाँकटाइ वादळाची आगेकूच
चक्रीवादळ
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 6:06 PM

मुंबई: अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा  हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे. (New Cyclone toktoi coming towards Arabian Sea from Myanmar high alert issue for Maharashtra Gujarat and Kerala)

अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. त्या चक्रीवादळाला म्यानमारने टाँकटाइ असं नाव दिलं आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.

म्यानमारकडून वादळाची आगेकूच सुरू

म्यानमारकडून वादळाची आगेकूच सुरु असून पुढील काही दिवसांमध्ये अरबी समुद्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि कर्नाटकमध्ये देखील पाऊस होण्याचा अदांज आहे. टाँकटाई या वादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

2021 मधील पहिलं चक्रीवादळ

महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं. निसर्ग चक्रीवादळानंतर मोठ्या स्वरुपातील टाँकटाई हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागपूरमध्ये गारपीट

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस कोसळला. या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. या दरम्यान काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. रामटेक शहरात ही अर्धा तास झालेल्या पावसात दहा मिनिटं मध्यम आकाराची गारपीट झाली. रामटेक आणि कोदमेंडी परिसरता झालेल्या पावसानं आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब

Weather Alert | येत्या 24 तासात पावसाची शक्यता, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

(New Cyclone toktoi coming towards Arabian Sea from Myanmar high alert issue for Maharashtra Gujarat and Kerala)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.