Corona New Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने मुंबईची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा बीएमसीचा विचार

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona New Variant) मुंबईचीही चिंता वाढली आहे. त्याची खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन (Quarantine) करण्याचा विचार पालिका (BMC) करत आहे. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतेही मागणी नाही, असं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे.

Corona New Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने मुंबईची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा बीएमसीचा विचार
प्रशासन व सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona New Variant) मुंबईचीही चिंता वाढली आहे. त्याची खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन (Quarantine) करण्याचा विचार पालिका (BMC) करत आहे. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतेही मागणी नाही, असं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे.

जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिकेचा भर

परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच, या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली आहे.

सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरीयंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर असणार आहे. आज संध्याकाळी साडे पाच वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेतील. या बैठकील सर्व कोव्हिड हॉस्पिटलचे डिन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

Thane Sero Survey | ठाण्यात सिरो सर्वेक्षण, 90% हून अधिक जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या

Vaccination: औरंगाबादेत आता पेट्रोल पंपावर लस मिळणार, जिल्ह्यात लसीकरणात 10 टक्क्यांची वाढ

Published On - 1:14 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI