राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 13 हजार नवजात बालकांचा मृत्यू

बालमृत्यूचे प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल 13 हजार 070 नवजात बालकांचा मृत्यू झाला (Newborn Baby Died) आहे.

राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 13 हजार नवजात बालकांचा मृत्यू
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !

मुंबई : राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न होत (Newborn Baby Died) असतात. मात्र तरीही बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तब्बल 13 हजार 070 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 1 हजार 402 बालमृत्यू झाले आहेत. एच.एम.आय.एस. च्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत दिली.

एच.एम.आय.एसने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात 2018-19 या काळात 13 हजार 070 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 1 हजार 402 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2018-19 या काळात 2 लाख 11 हजार 772 बालकांचे वजन जन्मत: अडीच किलोपेक्षा कमी असल्याचंही उघडकीस आलं आहे.

विशेष म्हणजे मुंबईमध्ये सर्वाधिक 22 हजार 179 कमी वजनाच्या बाळांचा जन्म झाला आहे. तसेच 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात 12 हजार 147 अर्भक मृत्यू आणि 11 हजार 66 बालमृत्यू झाले आहेत. तर एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान 1 हजार 070 मातांचे मृत्यू झाले.

एच.एम.आय.एसने दिलेल्या अहवालानुसार, अकाली जन्मलेली बालकं, जन्मतः कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वसावरोध/आघात अशी नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे आहेत. तर प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब, अति रतक्स्त्राव, जंतूदोष यामुळे मातांचा मृत्यू (Newborn Baby Died) होतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI