MTNL Fire : टेरेसवर जीव मुठीत धरुन शेकडो कर्मचारी, आग विझवण्यासाठी रोबोटही धावला!
वांद्रे येथील MTNL च्या दहा मजलीइमारतीला दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी इमारतीत शेकडो कर्मचारी होते. आधी तिसऱ्या मजल्याला लागलेली आग पुढे भडकत जाऊन चौथा आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली.

MTNL FIRE मुंबई : वांद्रे येथील MTNL च्या दहा मजलीइमारतीला दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी इमारतीत शेकडो कर्मचारी होते. आधी तिसऱ्या मजल्याला लागलेली आग पुढे भडकत जाऊन चौथा आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे कर्मचारी घाबरुन इमारतीच्या टेरेसवर जाऊन पोहोचले. शेकडो कर्मचारी जिवाच्या आकांताने टेरेसवर गेले.
या आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास तीन तासानंतरही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलं नाही. अग्नीशमन दलाचे जवान एकीकडे आग विझवण्याचं काम करत होते, तर त्याचवेळी दुसरीकडे ते टेरेसवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवत होते. अग्नीशमन दलाच्या 70 मीटर उंच क्रेनच्या सहाय्याने 60 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सुरक्षित खाली उतरवलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्नीशमन दलाने आपला खास रोबोटही मैदानात उतरवला.
दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली. आग लागली त्यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात होते. आगीमुळे धुराचे लोट पसरुन इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला वेढला. आग भडकत जाऊन ती तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी थेट टेरेसकडे धाव घेतली.
VIDEO : वांद्र्यातील MTNL इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबोटची मदत #MumbaiFire @mybmc pic.twitter.com/3aylAHK500
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2019
रोबोटची मदत
या आगीची माहिती देताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, “अत्याधुनिक साधने आणि रोबोटच्या (Robot) सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरु आहे. लोकांना सुखरुप बाहेर काढले जात आहे. बऱ्याच लोकांना बाहेर काढले असून, बचावकार्य अद्याप सुरुच आहे.
रवी राजा, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते
केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील इमारतींचं फायर ऑडिट होणं गरजेचं आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व इमारतींचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, फायर ऑडिटबाबत दिलेल्या सर्व निर्देशांवर काम होणं गरजेचं आहे. वारंवार होणाऱ्या आग दुर्घटनांना निष्क्रीय प्रशासन जबाबदार आहे, अशी टीका मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.