AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोविड ऐकलं तरी लोक दुर जायचे, अशावेळी निलेश लंके यांनी रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला’, सुप्रिया सुळेंकडून कौतुकाचा वर्षाव

लंके यांनी त्यांच्याकडे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना हे कोविड सेंटर उभारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लंके यांच्या कोविड सेंटरचं आणि त्यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंय.

'कोविड ऐकलं तरी लोक दुर जायचे, अशावेळी निलेश लंके यांनी रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला', सुप्रिया सुळेंकडून कौतुकाचा वर्षाव
खासदार सुप्रिया सुळेंकडून आमदार निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 9:03 PM
Share

अहमदनगर : राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना अनेक नेते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली. अशाच एका कोविड सेंटरची चर्चा राज्यासह अवघ्या देशभरात होत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. लंके यांनी त्यांच्याकडे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना हे कोविड सेंटर उभारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लंके यांच्या कोविड सेंटरचं आणि त्यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंय. (Supriya Sule appreciates the work of MLA Nilesh Lanke)

आमदार निलेश लंके यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर असं नाव दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोग्य मंदिरातील अर्थात कोविड सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर्स, स्वयंसेवक, कर्मचारी आणि इतरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला, अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिलीय. ‘कोविड ऐकले तरी लोक दुर जायचे त्या काळात निलेश लंके यांनी रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला. हे अतिशय उत्तम कार्य असून याची नोंद त्यांच्या मतदारसंघाने घेतलीच यासोबत देशभरातील माध्यमांनी देखील घेतली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते काम करीत आहेत. व्यवस्थापनातील कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्यांच्याकडे व्यवस्थापनातील कोणतीही डिग्री नाही.पण तरीही त्यांनी उत्तम दर्जाचे व्यवस्थापन केले आहे.ते महाराष्ट्राचे पुत्र आहेत.निलेश लंके,त्यांचे कुटुंब आणि सहकाऱ्यांना खुप खुप शुभेच्छा’, अशा शब्दात सुळे यांनी आमदार लंके यांच्या कार्याचं कौतुक केलंय.

फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिसमधून आर्थिक मदत

या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत सर्व देखभाल करण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. या कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशांमधून लोकांनी आर्थिक मदत केलीये. तर या सेंटर उभारण्यासाठी अरुण भुजबळ यांनी आपले मंगल कार्यालयात मोफत दिलेय, अशी माहिती लंके यांनी दिलीय.

“स्वतःचा मुलगाही जेवढी सेवा करणार नाही इतकी सेवा निलेश लंके करतात”

लंके यांचं काम पाहून अनेक रुग्णांच्या डोळ्यात अश्रू येतात. स्वतःचा मुलगा देखील इतकी सेवा करू शकत नाही इतकी सेवा निलेश लंके करत असल्याचं हे रुग्ण सांगतात. निलेश लंके हे आमची दिवसरात्र काळजी घेतात, अशी भावना काही महिलांनी व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या : 

Breaking : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

शेतकऱ्यांनो, 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा, कृषी विभागाचं आवाहन, 5 दिवस धुवाँधार पावसाचे

MP Supriya Sule appreciates the work of MLA Nilesh Lanke

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.