मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंचा खोचक सवाल, विलिनीकरणावरुन अनिल परबांना टोला, रावतेंना प्रश्न विचारण्याचं चॅलेंज

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंचा खोचक सवाल, विलिनीकरणावरुन अनिल परबांना टोला, रावतेंना प्रश्न विचारण्याचं चॅलेंज
नितेश राणे
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 3:07 PM

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असं नितेश राणे म्हणाले. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला. सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे,असं नितेश राणे म्हणाले.

सरकारचे प्रतिनिधी का येत नाहीत?

आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटत, मुख्यमंत्र्याच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहे. मात्र, डॉक्टरांनी एक संशोधन केलंय नेमक या माणसाला कणा आहे का पाहायला पाहिजे. कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही. तुम्हाला एवढे दिवस इथं बसवलं आहे. एक तरी आमदार, पालकमंत्री, मंत्री,मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी इथं येत नाही. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये होता त्यावेळी त्यांना झोप येत नव्हती. आमच्या राष्ट्रवादीच्या ताई आहेत, त्या ताई म्हणाल्या आर्यन खान जेलमध्ये असल्यानं त्याच्या आईला काय वेदना होत असतील ते आई म्हणून कळतंय. ताई असंख्य महिला इथं बसल्यात त्यांच्या आईला काय वाटत असेल याचा ताईला वाईट वाटत नाही. हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत.

कमिशन मिळणार नसल्यानं विलिनीकरण नाही

या लोकांना विलनीकरण का नकोय, याचं कारण आहे. वाय फाय असो, टायरच्या किमती यामध्ये कमिशन कसं खाणार?,शासनामध्ये विलिनीकरण झालं तर अनिल परब कशी वसुली करणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या भगिनी परिवहन मंत्र्यांना भेट पाठवणार आहेत, मी त्यांना सांगतो बदाम पाठवा. परिवहन मंत्री विचारतात तुमच्या काळात विलिनीकरण का केलं नाही. तुमच्या रावतेंना विलिनीकरण का केलं नाही ते विचारलं पाहिजे. दिवाकर रावते एमआयएममध्ये गेलेत का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीमध्ये व्यस्त असल्यानं दिवाकर रावते यांच्याशी बोलायला यांच्याकडे वेळ नाही, असं राणे म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये

एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहात हे चुकीचं आहे. एसटी कर्मचारी आत्महत्या करतोय पण पुढच्या लोकांना आत्महत्या करायला लावूया. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन नितेश राणे यांनी केला. तुम्ही आत्महत्या करता म्हणजे आमच्यावर विश्वास नाही, असं होतं. तुम्ही आत्महत्या करु नका असं आवाहन नितेश राणे म्हणाले. राज्य सरकारला झोपावयचंय, असं नितेश राणे म्हणाले. कोरोनाच्या काळात तुमचा मुख्यमंत्री घरात बसला होता त्यावेळी एसटी कर्मचारी राज्यभर फिरत होते, असं नितेश राणे म्हणाले.

इतर बातम्या:

औरंगाबादः माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या 260 गोळ्या! संशयित अटकेत

Positive News: शेतकऱ्यांच्या मनात तेच होणार का बाजारात ? सोयाबीनच्या दराबाबत आशादायी चित्र

Nitesh Rane slam MVA Government Anil Parab and Uddhav Thackeray over ST strike

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.