ये है उद्धव ठाकरे का ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यावर खोचक टीका

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्यानेही खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. (nitesh rane slams cm uddhav thackeray over no relaxation to temple restrictions in Maharashtra)

ये है उद्धव ठाकरे का 'नया महाराष्ट्र'; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यावर खोचक टीका
nitesh rane

मुंबई: राज्य सरकारने लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्यानेही खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ये है उद्धव ठाकरे का ‘नया महाराष्ट्र’, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. (nitesh rane slams cm uddhav thackeray over no relaxation to temple restrictions in Maharashtra)

नितेश राणे यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण… हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे… हिंदू हो, तो डर के रहो… ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांनी अत्यंत खोचकपणे मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. त्यामुळे त्याला शिवसेनेतून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे.

कोरोना निर्बंधांबाबत कोणते महत्वाचे निर्णय?

>> 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.

>> हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

>> विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.

>> सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

>> खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

>> सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

>> सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

>> इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे. (nitesh rane slams cm uddhav thackeray over no relaxation to temple restrictions in Maharashtra)

संबंधित बातम्या:

Photo Story: 29 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा आसूड कडाडणार; नाशिकमध्ये जिल्हाव्यापी ‘ट्रॅक्टर मार्च’ची हाक!

Maharashtra cabinet Decision : अनाथांना एक टक्का आरक्षण मिळणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय?

शाळा-कॉलेज सुरु करण्यावर अवघ्या 24 तासात ब्रेक, आज-उद्या अंतिम निर्णय अपेक्षित, टास्क फोर्सचा विरोध का?

(nitesh rane slams cm uddhav thackeray over no relaxation to temple restrictions in Maharashtra)

Published On - 12:56 pm, Wed, 18 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI