Photo Story: 29 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा आसूड कडाडणार; नाशिकमध्ये जिल्हाव्यापी ‘ट्रॅक्टर मार्च’ची हाक!

कृषी कायदे रद्द करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता नाशिकच्या शेतकऱ्यांनी दंड थोपाटले आहेत. (Nashik Farmers will arrange tractor march against farm laws)

Photo Story: 29 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा आसूड कडाडणार; नाशिकमध्ये जिल्हाव्यापी 'ट्रॅक्टर मार्च'ची हाक!
tractor march

नाशिक: कृषी कायदे रद्द करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता नाशिकच्या शेतकऱ्यांनी दंड थोपाटले आहेत. नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीने येत्या 29 ऑगस्ट रोजी जिल्हाव्यापी ट्रॅक्टर मार्चची हाक दिली आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (Nashik Farmers will arrange tractor march against farm laws)

नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीची 16 ऑगस्ट रोजी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैठक झाली. या बैठकीला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच माकप व भाकपचे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो ट्रॅक्टर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला 500 पेक्षा जास्त शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

tractor march

tractor march

या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, योगेश घोलप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, आयटकचे राजू देसले, सीटूचे तानाजी जायभावे यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यामुळे शेतकरी व शेती धंदा कसा उद्धवस्त होणार आहे यावर सर्वच नेत्यांनी प्रकाश टाकला.

tractor march

tractor march

गेल्या नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या पाठिंब्यांकरिता व मोदी सरकारच्या निषेधार्थ 29 ऑगस्टच्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो ट्रॅक्टर घेऊन सामील व्हा, असे आवाहन सर्व नेत्यांनी यावेळी केले. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. याप्रसंगी अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बहुजन शेतकरी संघटना, काँग्रेस किसान सेल, राष्ट्र सेवा दल वगैरे संघटनांचे अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. (Nashik Farmers will arrange tractor march against farm laws)

 

संबंधित बातम्या:

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका

VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचाच उडाला थरकाप, मुलींनी नेमकं काय केल; हा व्हायरल व्हिडिओ पाहाच!

(Nashik Farmers will arrange tractor march against farm laws)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI