उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीतून सूचना ! काय कारवाई होणार?
मतदानाच्या पाचव्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी मतदान संपण्याआधीच पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर आरोप केले होते. मुद्दाम धिम्या गतीनं मतदान सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

उद्धव ठाकरे यांनी 20 तारखेला मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेवरुन उद्धव ठाकरेंवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं, राज्य निवडणूक आयोगाला योग्य कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
२० मे रोजी, शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरु असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केलेल्या याच टीकेवरुन आता कारवाई होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिलेत. म्हणजेच उद्धव ठाकरेंवर आता राज्य निवडणूक आयोग कारवाई करु शकते.
मुंबईतल्या संथ गतीनं सुरु असलेल्या मतदानावरुन उद्धव ठाकरेंनी 5 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेवून आयोग आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार भाजपच्या आशिष शेलारांनी केली होती. त्यानुसार आयोगानं पत्रकार परिषद तपासून तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरुन आता राज्य निवडणूक आयोग काय कारवाई करते, हे बघावं लागेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी माहिती दिली की, निवडणूक आयोगाने प्रमुख नेत्यांना नोटीस बजावल्या, अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवलाय आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष करण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान मिळालेल्या तक्रारींवरुन कारवाई केली. ज्यामध्ये 13 जणांना नोटीस बजावण्यात आली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, निवडणूक आयोगाने 14 एमसीसी प्रकरणे थेट हाती घेतली आणि त्यापैकी 13 प्रकरणांमध्ये नोटिसा बजावल्या. निवडणूक आयोगाने 26 एप्रिल रोजी काँग्रेस नेत्या आणि तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांना नोटीस जारी न करता थेट फटकारले.
सुरेखा यांनी BRS नेते केटी रामाराव यांच्यावर “फोन टॅपिंग” केल्याचा आरोप केला तसेच वैयक्तिक आरोप केले. बिनबुडाचे आरोप केल्याने याविरुद्ध MCC तरतुदींचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली.
