AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे शिवसेना भवन सांभाळतील, पण त्या आधी या गोष्टी जाण्याची शक्यता

शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असे म्हणत शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

ठाकरे शिवसेना भवन सांभाळतील, पण त्या आधी या गोष्टी जाण्याची शक्यता
| Updated on: Feb 19, 2023 | 12:29 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. आता एकनाथ शिंदे यांचा पुढील डाव काय आहे? दादरचे शिवसेना भवन त्यांना मिळणार नाही. यामुळे त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांचे लक्ष नाही. परंतु शिवसेनेचा पाया समजल्या जाणाऱ्या राज्यातील असंख्य शाखांवर त्याचे लक्ष असणार आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शुक्रवारी स्थानिक शाखेच्या नियंत्रणावरून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. शाखांचे नेटवर्क अजूनही आपल्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवसेना भवन कोणाचे?

शिवसेनेचे दादरमधील सेना भवन यावर पक्षाची मालकी नाही. हे भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे. शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. तसेच इतर ट्रस्टीही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवाई ट्रस्ट म्हणजेच शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे.

दापोलीत नेमके काय झाले

शिंदे गटातील आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी केली होती. शुक्रवारी झालेल्या या प्रकारामुळे दापोलीत तणावाचे वातावरण होते. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली होती. शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असे म्हणत शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहे.

आता शिंदे यांची काय असणार खेळी

काही राजकीय निरीक्षकांच्या मते, आता शिंदे सेना टप्प्याटप्प्याने शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकते. शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. यामुळे शिवसेनेच्या विविध शाखा आणि आघाड्या हा एक वादाचा विषय ठरणार आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतरही उद्धव गट शाखा आणि पदाधिकारी कसे टिकवणार हा वेगळा प्रश्न आहे. शिवसेनेच्या राज्यभरात अनेक शाखा आहेत. त्यांची कार्यालये आहे. परंतु त्यातील किती कार्यालये अधिकृत आहेत, ती कोणाच्या नावावर आहे, याची माहिती उपलब्ध नाही.

काय म्हणतात संजय राऊत

दुसरीकडे उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा शिंदे गटास घेता येणार नाही. आमचे शिवसैनिक तिथे बसून राहतील. शिवसेनेच्या शाखा नेहमीप्रमाणे चालवतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.