वाघासारखं नेतृत्व पिंजऱ्याबाहेर पडलं, एकनाथ खडसे म्हणाले, यामुळे आता… 

शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेचा आता दुसरा टप्पा आहे, त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारीही खासदार संजय राऊत यांच्याकडे असणार आहे.

वाघासारखं नेतृत्व पिंजऱ्याबाहेर पडलं, एकनाथ खडसे म्हणाले, यामुळे आता... 
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 8:34 PM

जळगावः उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या सुटकेमुळे आनंद व्यक्त केला असून त्यांच्या येण्यामुळे फायदा होणार असल्याचा दावा अनेक नेते करत आहेत. याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी पिंजऱ्यातून वाघ बाहेर आल्याची भावना व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, शिवसेनेचे आक्रमक व वाघासारखं नेतृत्व हे आता पिंजऱ्याबाहेर पडले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह व चेतना संचारली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत बाहेर पडल्यामुळे शिवसेनेलाच नाही तर महाविकास आघाडीलाही त्याचा फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सामनाच्या माध्यमातूनदेखील त्यांचं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांची सुटका झाल्यामुळे शिवसेनेतील अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेचा आता दुसरा टप्पा आहे, त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारीही खासदार संजय राऊत यांच्याकडे असणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. संजय राऊत या यात्रेत सहभागी होणार असल्यामुळेही शिवसैनिकामंध्ये संचारला आहे.

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यांच्या सुटकेमुळे आनंद व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.