AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी ही पक्त स्टंटबाजी”; विरोधकांनी तक्रारीची खिल्ली उडवली

आपली सुपारी राजा ठाकुर याला दिल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे राजा ठाकुरचीही चौकशी केली जाणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी ही पक्त स्टंटबाजी; विरोधकांनी तक्रारीची खिल्ली उडवली
| Updated on: Feb 21, 2023 | 3:47 PM
Share

मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खासदार आणि मुख्यमंत्री सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट आता आमने सामने आले आहेत. संजय राऊत यांना सुपारी दिली असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता  शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी संजय राऊत यांना आता काही काम राहिले नाही त्यामुळे त्यांची ही स्टंटबाजी सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

तर मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मुख्यमंत्र्याबरोबरची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.

त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेच्या गरड्यात वावरण्याची सवय संजय राऊत यांना लागली होती. त्यामुळेच त्यांनी आता पुन्हा एकदा संजय राऊत यांना सुरक्षा व्यवस्था मिळण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही त्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे आता या जीवे मारण्याची सुपारी दिल्याच्या तक्रारीनंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटातील आणि ठाकरे गटातील नेत्यांनीही केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी ज्या श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केल्यानंतर आता राजकारण प्रचंड तापले आहे.  त्याचबरोबर त्यांनी आपली सुपारी राजा ठाकुर याला दिल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे राजा ठाकुरचीही चौकशी केली जाणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

श्रीकांत शिंदे यांच्यावर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वाढली आहे. संजय राऊत यांना पोलिसात बोलवून त्यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातील वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

खासदार संजय राऊत यांनी या  प्रकरणी म्हटले आहे की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपली सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यावेळीही मी सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांना सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कशी होणार याकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.