CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील किती रक्कम दोन वर्षात खर्च झाली?; आकडाच सर्व काही सांगतो

मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीतून वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. गेल्या दोन वर्षात या निधीतील केवळ 31 कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत.

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील किती रक्कम दोन वर्षात खर्च झाली?; आकडाच सर्व काही सांगतो
mantralaya

मुंबई: मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीतून वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. गेल्या दोन वर्षात या निधीतील केवळ 31 कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. म्हणजे 130 कोटी रुपयांपैकी 31 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही या निधीत 99 कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती उघड झाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत 28 नोव्हेंबर 2019 पासून आजमितीपर्यंत 130 कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 9 कोटी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) 30 सप्टेंबर 2021 रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून 99 कोटी रुपये शिल्लक आहेत. 28 नोव्हेंबर 2019 पासून 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 33 प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात आली आहे.

सरासरी 8 नागरिकांना दरदिवशी मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे, असा दावा गलगली यांनी केला आहे.

कुणाला किती मदत?

>> मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीत जमा 130 कोटी पैकी 31 कोटी खर्च, 99 कोटी शिल्लक

>> प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य

>> वैद्यकीय कारणांसाठी 22 महिन्यात 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित

>> नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य

संबंधित बातम्या:

Army Chopper Crash: हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी नक्की काय घडलं?, काही सेकंदाचा व्हिडीओसमोर, ब्लॅक बॉक्सही सापडला

Video :अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती कशी आहे? राजनाथ सिंगांची सभागृहाला माहिती

Ashish Shelar : महापौर किशोरी पेडणेकरांविषयीचं वक्तव्य भोवलं, आशिष शेलारांवर गुन्हा दाखल

Published On - 1:31 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI