पालघरमधील भूकंपाच्या धक्क्यांचा पहिला बळी, घाबरुन पळताना मुलीचा मृत्यू

पालघर : राजधानी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी गेल्या काही दिवसांपासून नागरिक भयभीत झाले आहेत. या भूकंपाने पहिला बळी घेतलाय. भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीने पळणाऱ्या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सततच्या भूकंपाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बसणाऱ्या सौम्य, मध्यम आणि जोरदार भूकंपाच्या अचूक नोंदी आणि केंद्र बिंदू नोंदता […]

पालघरमधील भूकंपाच्या धक्क्यांचा पहिला बळी, घाबरुन पळताना मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पालघर : राजधानी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी गेल्या काही दिवसांपासून नागरिक भयभीत झाले आहेत. या भूकंपाने पहिला बळी घेतलाय. भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीने पळणाऱ्या दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सततच्या भूकंपाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बसणाऱ्या सौम्य, मध्यम आणि जोरदार भूकंपाच्या अचूक नोंदी आणि केंद्र बिंदू नोंदता यावेत यासाठी आणखी दोन भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले आहेत. भूकंपाची नोंद व्हावी या दृष्टिकोनातून तत्पूर्वीच धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे भूकंपमापन यंत्र कार्यान्वित करण्यात आले होते. त्यानंतर डहाणू येथील जामशेत अंगणवाडी केंद्रात आणि तलासरी तालुक्यातील सुतारपाडा येथे तिसरे भूकंप मापन यंत्र कार्यन्वित करण्यात आले आहे.

20 जानेवारी रोजी 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद होताच सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली. त्यानंतर 24 जानेवारी रोजी 3.4 रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची तीव्रता वाढल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाकडून आणखी दोन भूकंप मापन यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याचं सांगण्यात आलं आहे.

तलासरी आणि डहाणू परिसर शुक्रवारी रात्री 3.25 पासून सतत हादरत आहे. संध्याकाळपर्यंत 15 पेक्षा जास्त सौम्य आणि जोरदार धक्के जाणवले आहेत. त्यापैकी सकाळी 6.58 वाजता 3.3 रिश्टर स्केल,10.03 वाजता 3.5 रिश्टर स्केल आणि 10. 29 वाजता पुन्हा एकदा 3 रिश्टर स्केल, 2.06 वाजता पुन्हा 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली.

जिल्ह्यातील कोणकोणत्या भागात भूकंपाचे धक्के?

1 डिसेंबर आणि 10 डिसेंबरला असेच दोनदा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने  परिसराला हादरला होता. आतापर्यंत शनिवार आणि रविवारी भूकंपाचे हादरे बसत होते आणि आता तर शुक्रवारी रात्री पासूनच सुरुवात केली आहे. म्हणून लोकांमध्ये शुक्रवार का भूकंपवार? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी शाळा इमारतीला जोरदार धक्के बसल्याने सर्व मुले घाबरून वर्गाबाहेर पडली होती.

धुंदलवाडी, दापचरी, वांकास, चिंचले, हळदपाडा परिसरात तर सतत भूकंपाचे हादरे चालूच आहे .या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरू असून आतापर्यंत शेकडो वेळा सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरीत सकाळी 10.03 वाजता 3.05 त्यानंतर 2 वाजून 6 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केलचा सर्वात मोठा जोरदार धक्का बसला होता.

शुक्रवारी या भूकंपाची तीव्रता तलासरी, वडवली, सावरोली, कवडा, वरखंडा, जांभळून पाडा, शिसणे, करंजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, दापचरी, सासवंद, गांगणगाव, आदी भागातील लोकांनी जोरदार झटका जाणवल्याचा अनुभव व्यक्त केला.

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

11 नोव्हेंबर – 3.2 रिश्टर स्केल

24 नोव्हेंबर – 3.3 रिश्टर स्केल

1 डिसेंबर – 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल

4 डिसेंबर – 3.2 रिश्टर स्केल

7 डिसेंबर – 2.9 रिश्टर स्केल

10 डिसेंबर – 2.8 आणि  2.7 रिश्टर स्केल

20 जानेवारी 3.6 – रिश्टर स्केल

24 जानेवारी – 3.4 रिश्टर स्केल

1 फेब्रुवारी 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल

यानंतर शुक्रवारी 3.55 वाजता मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र अद्याप याची आकडेवारी मिळू शकलेली नाही.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.