AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महानगरपालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला; तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर; 1890 मध्य बांधकाम

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाला महत्वाचे मानले जाते.

महानगरपालिकेचा पवई तलाव भरुन वाहू लागला; तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर; 1890 मध्य बांधकाम
| Updated on: Jul 05, 2022 | 10:44 PM
Share

मुंबईः मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव (Pawai lake) आज (दि.5) सायंकाळी वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे नागरिकांसाठी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी हे पाणी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू (lake Overflow) लागला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाला महत्वाचे मानले जाते. या तलावाची निर्मिती करण्यात आली होती, त्यावेळी या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला होता.

पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर

या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असल्याचेही सांगण्यात आले.

तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. (5455 दशलक्ष लिटर) एवढी क्षमता आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....