नेमाडे देशी दारु पिऊन ‘त्यावर’ कादंबरी लिहीत आहे; पूजाची शेवटची फेसबूक पोस्ट आता चर्चेत

पूजा चव्हाणनं मंत्र्यासोबतच्या कथित संबंधात आत्महत्या केल्याची जोरात चर्चा असतानाच तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. (pooja chavan facebook post viral on soc social media against bhalchandra nemade's book)

नेमाडे देशी दारु पिऊन 'त्यावर' कादंबरी लिहीत आहे; पूजाची शेवटची फेसबूक पोस्ट आता चर्चेत
पूजा चव्हाण- भालचंद्र नेमाडे
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 1:34 PM

मुंबई: पूजा चव्हाणनं मंत्र्यासोबतच्या कथित संबंधात आत्महत्या केल्याची जोरात चर्चा असतानाच तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. ही चर्चा विशेषत: साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात होतेय. मराठीच्या सार्वकालिन महान कादंबरीकाराबद्दल जी भाषा पूजा चव्हाणनं वापरली आहे त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. (pooja chavan facebook post viral on soc social media against bhalchandra nemade’s book)

काय आहे पूजाच्या फेसबूक पोस्टमध्ये?

पूजा लहू चव्हाण नावानं पूजाचं फेसबूक अकाऊंट आहे. त्याच्या कव्हर फोटोवर तिचे आईवडील आणि संजय राठोड एकत्र असतानाचा फोटो आहे. 26 हजारापेक्षा जास्त तिचे फॉलोअर्स आहेत. त्याच अकाऊंटवर 18 जानेवारीला पूजा चव्हाणची शेवटची पोस्ट आहे. त्यात ती लिहिते,’8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजीनिअरिंगमध्ये येवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध करत आहे आणि हा नालायक खान्देशी लेखक “भालचंद्र नेमाडे” देशी दारू पिऊन त्यावर कादंबरी लिहीत आहे… असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध…

पूजा चव्हाणच्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह काय?

भालचंद्र नेमाडे हे मराठीतले महान कादंबरीकार असल्याचं त्यांचे टिकाकारही मान्य करतात. त्यांच्या साहित्यिक लिखानाबद्दल वाद होऊ शकतो, मत मतांतरे असू शकतात. पण ती व्यक्त करण्याची भाषा, लहेजा महत्वाचा आहे. पूजाच्या फेसबूक पोस्टमध्ये तिनं नेमाडेंसाठी नालायक, मतिमंद, देशी दारु पिऊन कादंबरी लिहिणारा अशी शिवराळ भाषा वापरली गेली आहे. त्यावर वेगवेगळ्या माध्यमात प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमाडेंच्या कोणत्या कादंबरीबद्दल पूजाची पोस्ट?

भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ नावाची कादंबरी लिहीली आहे. पॉप्युलर प्रकाशनानं ती 2010 साली प्रकाशित केली आहे. जवळपास 602 पानांची क्लासिक पद्धतीची कादंबरी आहे. याच कादंबरीसाठी भालचंद्र नेमाडेंना सुवर्णमहोत्सवी ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हा भारतीय भाषेतील साहित्यिक लिखानासाठी दिला जातो. तो देशातला सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. याच कादंबरीत नेमाडेंनी बंजारा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखान केल्याचा काही राजकीय मंडळी आरोप करत आहेत. त्याच्याविरोधात काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले गेले आहे. पूजाची फेसबूक पोस्ट त्याच संदर्भानं आहे.

(pooja chavan facebook post viral on soc social media against bhalchandra nemade’s book)

कोण आहेत भालचंद्र नेमाडे?

मराठी वाचकाला भालचंद्र नेमाडे या नावाच्या परिचयाची गरज नाही. पन्नास वर्षाहून अधिक काळ ते मराठी वाचकाची भूक भागवत आहेत. 1963 साली नेमाडेंच्या आलेल्या ‘कोसला’ ह्या पहिल्या कादंबरीनं मराठी साहित्याची दिशा बदलून टाकली. अवघ्या दोन आठवड्यात लिहिलेली ही कादंबरी आतापर्यंतची सर्वाधिक वाचली जाणारी मराठी कादंबरी आहे. त्यातल्या पांडुरंग सांगवीकरच्या प्रेमात अजूनही वाचक आहेत. तिचे इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर झालं. फक्त मराठीच नाही तर भारतीय साहित्यात कोसलाला मानाचं स्थान आहे. त्यानंतर बिढार (1975), हूल (1975), जरीला (1977), झूल (1979) अशा आणखी चार कादंबऱ्याही नेमाडेंनी लिहिल्या आणि त्या तेवढ्याच लोकप्रिय झाल्या. त्यानंतर ‘हिंदू’साठी मात्र तीन दशकं मराठी वाचकांना वाट पहावी लागली. ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरीही गेल्या दहा वर्षापासून मराठी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचे पुढचे भाग लिहित असल्याचं नेमाडेंनी आधीच जाहीर केलेलं आहे. त्याची उत्सुकता मराठी वाचकांसह देशातील साहित्यिकांनाही आहे. (pooja chavan facebook post viral on soc social media against bhalchandra nemade’s book)

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Death | Audio Clip | दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे, कार्यकर्त्याला कथित मंत्र्याचे आदेश, दुसरी ऑडिओ क्लिप

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

(pooja chavan facebook post viral on soc social media against bhalchandra nemade’s book)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.