Pooja Chavan Case : कुठं कुठं जायाचं? कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip

Pooja Chavan Case : कुठं कुठं जायाचं? कुलू, मनाली, शिमला, गबरुशेठची एन्ट्री आणि मंत्री महोदय, आणखी एक Audio clip
पूजा चव्हाणची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल Pooja Chavan new audio clip

पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. Pooja Chavan And Gabaru Sheth Audio Clip

Yuvraj Jadhav

|

Feb 24, 2021 | 1:23 PM

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan) प्रकरणातआणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यापूर्वी ज्या ऑडिओ क्लिप आल्या त्यातल्या सर्वच्या सर्व क्लिप आम्ही आपल्याला ऐकवल्या आहेत आणि त्याचं शब्दांकनही केलेलं आहे. आता पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, गबरुशेठ कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गबरुशेठविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.  (Pooja Chavan And Gabaru Sheth Audio Clip )

पूजा चव्हाण गबरुशेठमध्ये मंबई-पुणे ते कुलू मनाली जम्मू काश्मीर पर्यंतची चर्चा

गबरुशेठ आणि पूजा चव्हाण यांच्यातील 3 मिनिटे 57 सेकंदाच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे. या क्लिपमध्ये गबरुशेठ आणि पूजा यांच्या फोननंबर रिजेक्ट लिस्टमधून काढणे, कुलू मनाली,जम्मू काश्मीरला फिरायला जाण्याबद्दल चर्चा झाल्याचा संवाद आहे. मुंबई, पुणे येथे फिरण्यावरुनही या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद ऐकायला मिळतो. पूजा आणि गबरुशेठ यांच्यातील संभाषण सुरु असताना ती एका इमारतीच्या गच्चीवर उभी असल्याचं स्पष्ट होते.

ऑडिओ किल्पमधील संवाद

गबरुशेठ – हॅलो

पूजा चव्हाण – आपका हुकूम सर आँखों पर..रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय.

गबरुशेठ – हाहाहाहाहा…क्या बात है..थँक्यू थँक्यू..

पूजा चव्हाण – मी काढणार नव्हते महिनाभर तरी, मात्र तुमच्या शब्दापुढे जाता येत नाही.

गबरुशेठ – असं का…?

पूजा चव्हाण – विचारा किती दिवसांपासून…आठ दिवस झाले….अजून महिनाभर ठेवणार होते.

गबरुशेठ – वेटिंगवर टाका वेटिंग…मग बाकी…

ऑडिओ क्लिपच्या पहिल्या टप्प्यात पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यात फोननंबर रिजेक्ट लिस्टमधून काढण्याबद्दल चर्चा होते. यामध्ये पूजानं एका व्यक्तीचा फोननंबर रिजेक्ट लिस्टमध्ये आठ दिवस टाकला असल्याचं स्पष्ट होते.

पूजा चव्हाण – बाकी काय…हाय की आता तुमचं…काय करावं…इलाज नाही..

गबरुशेठ – कवा जायचं आपल्याला…

पूजा चव्हाण – मुंबईला, पुणे ?

गबरुशेठ – कुठंही जाऊ काय त्यात?

पूजा चव्हाण – बघा…आं…

गबरुशेठ – यस्स्स….

पूजा चव्हाण – कुलू मनालीला…आणि जम्मू काश्मीरला जाऊ…

गबरुशेठ – 100 टक्के जाऊ…

पूजा चव्हाण – बघा बघा रं…

गबरुशेठ – होय..

पूजा चव्हाण – लवकर वापस या..मग..

गबरुशेठ – ठीकय…

पूजा चव्हाण – लगेच निघा…काम झाल्या झाल्या…मग जाऊयात…

गबरुशेठ – बरं…

पूजा चव्हाण – पुणे, मुंबई बस झालं आता…

 

ऑडिओ क्लिपमधील पुढील संभाषणात पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यात कुलू मनाली आणि जम्मू काश्मीरला फिरायला जाण्याविषयी चर्चा होते. मुंबई आणि पुण्यामध्ये फिरुन कंटाळा आल्याचं पूजा चव्हाण गबरुशेठला सांगते.

 

पूजा चव्हाण – त्यांना म्हणावं…आधीच काडीयत..वाळून जाता म्हणावं..

गबरुशेठ – मग…

पूजा चव्हाण – खरं हाय का नाही…

गबरुशेठ – खरंय…खरंय..

पूजा चव्हाण – वाळून जाताल म्हणावं…उंच आहात..नाहीतर काय?

गबरुशेठ – खाऊ पिऊ घालत नसाल…

पूजा चव्हाण – बघा ना…काय माहित…विचारा त्यांना..

गबरुशेठ – तुमच्यामुळंच झालं ना…

पूजा चव्हाण – माझ्यामुळं कशाला…मी थोडीच त्यांना खाऊ पिऊ घालते..

गबरुशेठ – असंय का?

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं…

गबरुशेठ – काय काय…

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट दिसतंय… बाकी मजेत असतं सगळं..

गबरुशेठ – तुमचंबी पोटं पुढं आलंय..म्हणं ना…

पूजा चव्हाण – कोणाचं…माझं नाहीरं बाबा..स्लीम झालीय मी आता..

गबरुशेठ – हाहाहाहा

पूजा चव्हाण – स्लीम झाले मी आता…

गबरुशेठ – बरं..चालतंय…मग बाकी?

पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यात डबा देण्यावरुन आणि पोट पुढं येण्यावरुन चर्चा होते.

पूजा चव्हाण- बाकी काय निवांत…गच्चीवर उभी ठाकलीय… बघा हवा यायलीय मस्त...

गबरुशेठ – जास्त वेळ बोलू शकत नाही…

पूजा – हा सोबत माणसं आहेत ना…

गबरुशेठ – हो..हो..

पूजा चव्हाण – कळलं कळलं…झोपते मग मी…

गबरुशेठ – सकाळी बोलतो…

पूजा चव्हाण – ऐकलं बरं तुमचं… आता झोपते मी..

गबरुशेठ – हो..हो…झोपा झोपा..

पूजा चव्हाण – आणि त्यांना सांगा फोन करु नका….झोपू द्या…

गबरुशेठ – बरं बरं..फोन नाही करणार..ठीक आहे..

पूजा चव्हाण – हम्म्म…बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..

गबरुशेठ – बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..ओके बाय…

नव्या ऑडिओ क्लिपनं प्रकरणाचं गूढ वाढलं?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर 11 ऑडिओ क्लिप बाहेर आल्या होत्या. वनमंत्री संजय राठोड यांनी थेट पोहरादेवीच्या गडावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येविषयी दु:ख व्यक्त केले होते. संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाची आणि त्यांची बदनामी थांबवण्याचं आवाहन केले होते. 30 वर्षांच्या राजकीय जीवनात कोणीही सोबत येऊन फोटो काढते, असं म्हणतं संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी त्यांचा संबंध नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यामधील व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि नवनवे फोटो पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ वाढवत आहे.

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Death | Audio Clip | दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे, कार्यकर्त्याला कथित मंत्र्याचे आदेश, दुसरी ऑडिओ क्लिप

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें