Vidhan Parishad Election : मतदानाची रंगीत तालीम रंगली, परिषदेचा फडही जवळ आला, पुन्हा दंड थोपटले, यावेळी तरी मैदान मारणार?

शिवसेने आपले आमदार आणि काही अपक्ष आमदार आधीपासूनच हॉटेलमध्ये ठेवले आहेत. या आमदारांना कुणाला भेटण्याचीही परवानगी नाही. तसेच मागच्या वेळी मतदान करताना ज्या चुका झाल्या त्या आता पुन्हा होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी मतदान कसे करायेच आणि चुका कशा टाळायच्या? याची रंगीत तालीमही रंगतेय.

Vidhan Parishad Election : मतदानाची रंगीत तालीम रंगली, परिषदेचा फडही जवळ आला, पुन्हा दंड थोपटले, यावेळी तरी मैदान मारणार?
मतदानाची रंगीत तालीम रंगली, परिषदेचा फडही जवळ आला, पुन्हा दंड थोपटले, यावेळी तरी मैदान मारणार?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 4:13 PM

मुंबई : विधान परिषदेचा आखाडा (Vidhan Parishad Election) जसजसा जवळ येईल तसतसा राजकीय पक्षांच्या तयारीचा कस लागताना दिसतोय. मागच्या वेळी एवढी तयारी करूनही शिवसेनेच्या (Shivsena) एका उमेदवाराला हार पत्करावी लागली. ही हार फक्त एका जागेवरची हार नव्हती तर हा महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलेला चेकमेट होता. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार सुहार कांदे यांचं मत बाद झाल्याने शिवसेनेसाठी हाही एक मोठा झटका होता. मात्र या चुकीने पोळलेली शिवसेना आता सावध पाऊलं टाकताना दिसून येत आहे. शिवसेने आपले आमदार आणि काही अपक्ष आमदार आधीपासूनच हॉटेलमध्ये ठेवले आहेत. या आमदारांना कुणाला भेटण्याचीही परवानगी नाही. तसेच मागच्या वेळी मतदान करताना ज्या चुका झाल्या त्या आता पुन्हा होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी मतदान कसे करायेच आणि चुका कशा टाळायच्या? याची रंगीत तालीमही रंगतेय.

शिवसेनेच्या आमदारांची रंगीत तालीम

शिवसेना आमदारांची वेस्टीन  हाँटेलवर महत्वाची बैठक पार पडलीय. बैठकीत शिवसेना आमदारांना विधान परीषद निवडणुकीत मतदान कसं करावं याचं प्रत्यक्षिक दाखवलं जातं आहे.  प्रत्यक्ष मतदानावेळी जशी मतदान प्रक्रिया असते तसी रंगीत तालीम करणारं प्रत्यक्षिक सर्व आमदारांकडून करून घेतलं जाणार आहे. राज्यसभा निवडणुक मतदानावेळी झालेल्या चूका टाळण्यासाठी शिवसेना ही सर्व तयारी करत आहे. आता या रंगीत तालमीनंतर आणि केलेल्या सर्व तयारीनंतर तरी यावेळी शिवसनेचे दोन्ही उमेदवार मैदान मारणार का? मागचे दिवस पुढे येणार हे तर निवडणुकीचे निकालच सांगतील. तर दुसरीकडे भाजपही पुन्हा दंड थोपटले आहेत.

भाजप नेत्यांकडून आमदारांच्या भेटीगाठी सुरू

तिकडे भाजप आमदारांनी आपल्या पाचही जागा जिंकण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. यामुळे आज भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे थेट लोकल ट्रेन पकडून विरारला बहुजन विकास आघाडीच्या हिंतेंद्र ठाकूर यांना भेटायला जाताना दिसून आले. आता एवढे मोठे नेते अचानक कधी नव्हे लोकल ट्रेनमध्ये दिल्याने काही काळ हेच का ते म्हणून लोकांनाही विश्वास बसेना. मात्र होय हेच घडतंय सध्या. त्यामुळे भाजप नेत्यांची ही लोकल वारी त्यांना विधान परिषदेत पाचही उमेदवार निवडून देत सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेणार की या फास्ट लोकलला ब्रेक लावण्यात महाविकास आघाडी यशस्वी होणार? हेही काही दिवसातच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.