AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; आंबेडकरांची मागणी

नंदुरबार, धुळे, नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या आरक्षित जागा सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या आहेत. (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; आंबेडकरांची मागणी
प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 6:37 PM
Share

मुंबई: नंदूरबार, धुळे, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)

प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. नंदुरबार, धुळे, नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या आरक्षित जागा सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूका होऊ घातल्या आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यापूर्वीच कोरोनाच्या कारणास्तवमध्येच थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होणे आवश्‍यक आहे. सध्या या पाच जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. तेव्हा ही प्रलंबित निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी आंबेडकरांनी या पत्राद्वारे केली आहे. आंबेडकर यांनी 9 ऑगस्ट मदान यांना पत्रं पाठवून ही मागणी केली आहे.

अकोल्यात जिल्हा परिषदेच्या 14, पंचायत समितीच्या 28 जागांसाठी प्रक्रिया

अकोला जिल्ह्यात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार होते. अकोल्यात 14 जिल्हा परिषद व 28 पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता.

ऑनलाईन अर्ज मागवले होते

निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी ऑनलाईन अर्जही मागवले होते. अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 14 आणि सात पंचायत समित्यांच्या 28 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार होते. या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 29 जूनपासून सुरू करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार होते. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार होती. तर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर करण्यात आली होती.

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम -14 नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे -30 नंदूरबार -14 अकोला -28 वाशिम -27 नागपूर -31  (prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)

संबंधित बातम्या:

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले

Aurangabad Crime: धारदार शस्त्रानं हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली अंघोळ, घटनास्थळही धुऊन काढलं, ढोरकीन गाव पहाटेच हादरलं

Mumbai Sakinaka Case : मुंबई बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : वळसे-पाटील

(prakash ambedkar wrote to election commission for zp election in five district)

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.