AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’!, प्रसाद लाड यांचा भाई जगतापांना खोचक टोला

इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईतही हे आंदोलन पार पडले.

'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा नकार'!, प्रसाद लाड यांचा भाई जगतापांना खोचक टोला
Bhai Jagtap and Congress workers collapse from Bullock cart
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई : इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत जगताप यांना खोचक टोला लगावला आहे. (Prasad Lad slams Bhai Jagtap over Congress workers collapse from Bullock cart while protesting against Petrol Diesel price hike)

“गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोहोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.

दरम्यान, इंधन दरवाढी विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते उभे होते. काही वेळातच बैलगाडीचा भाग वेगळा होऊन तुटला आणि बैलगाडीत उभे असलेले कार्यकर्ते खाली पडले. या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका-टिप्पणी केल्या जात आहेत.

भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा

एका बैलगाडीवर जेवढे लोक बसू शकतात त्याच्या चारपट ओझे लादून बैलांचा छळ केल्याबद्दल भाई जगताप यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणीही कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन

मागील अनेक दिवसांपासून देशभरात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. अनेक राज्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. याच कारणामुळे राज्यात काँग्रेसतर्फे मागिल काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसनेसुद्धा आज अशाच प्रकारचे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलनामध्ये एक बैलगाडी आणण्यात आली होती.

भाई जगताप जमिनीवर कोसळले

या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले.

संबंधित बातम्या 

Video | “हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.