AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain Alert: सोसाट्याचा वारा…मेघांची गर्जना…पाऊस उडवणार दाणादाण…राज्यातील या जिल्ह्यात येत्या तीन दिवसात धुमाकूळ

Heavy Rain Alert: अल निनो आणि सुपर अल निनोच्या संकटापूर्वीच प्री मान्सून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात अल निनोचा धोका आहे. त्यापूर्वीच हवामान विभागाने 8, 9 आणि 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो.

Heavy Rain Alert: सोसाट्याचा वारा...मेघांची गर्जना...पाऊस उडवणार दाणादाण...राज्यातील या जिल्ह्यात येत्या तीन दिवसात धुमाकूळ
मुसळधार पावसाचा सांगावा Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 08, 2026 | 8:31 AM
Share

IMD Pre Mansoon Alert: प्री मान्सूनने देशभरात हजेरी नोंदवली आहे. त्यामुळे अचानक वातावरणात आणि हवामानात बदल दिसत आहे. देशातील अनेक राज्यात उकड्यापासून आणि उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी पावसाने धुमाकूळ घातला होता. तर यंदा पावसावर अल निनो, सुपर अल निनोचे सावट दिसत आहे. जुलै महिन्यात या घाडमोडींचा परिणाम होईल. पण त्यापूर्वी मान्सूनपूर्व वाऱ्यांनी थंडाव्याचा सांगावा आणला आहे. काळे ढग अनेक ठिकाणी दाटून आले आहेत. तर धुळीच्या वादळाने अनेक भागांना तडाखा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department – IMD) अनेक राज्यात 8, 9 आणि 10 मे रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट (Heavy Rain Alert) दिला आहे.

उत्तर-पश्चिम भारतावर आभाळमाया

मान्सूनपूर्वी पावसाने वेग धरला आहे. त्याचा परिणाम उत्तर-पश्चिम भारतावर दिसेल. हवामान विभागाने 8, 9 आणि 10 मे रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ताशी 30-50 किलोमीटर वेगाने वारा वाहिल. वावटळ आणि वीज पडण्याच्या घटना घडू शकतात.

देशभरात सर्वदूर पाऊस

पश्चिम भारतात हवामानात मोठा बदल दिसेल. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, 8, 9 आणि 10 मे रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा राज्यात मुसळधार पाऊस पडेल. या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि वीज पडण्याची शक्यता आहे.

यासह दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचे आगमन होईल. या तीन दिवसात मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालसह विदर्भापर्यंत ढगांची गट्टी जमलेली दिसते. या मध्य पट्ट्यात पाऊस धुमाकूळ घालेल. या पट्ट्यात ताशी 30-50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. धुळीच्या वादळाची शक्यता आहे. वीज पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तर मान्सूनपूर्व पाऊस केरळला चिंब करेल. यासह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुद्दुचेरी, रायलसीमेपर्यंत सर्वदूर पावसाचा धुमाकूळ दिसेल. या भागातही सोसाट्याचा वारा सुटेल आणि वादळ येईल. तर काही भागात वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मुसळ’धार’

हवामान खात्याच्या अलर्ट नुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर आभाळमाया असेल. कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडेल. या तीन दिवसात राज्यातील अनेक भागात जोरदार आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?