AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 7:26 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मोटरमॅनचं आंदोलन सुरू आहे. पन्नास ते साठ मोटरमॅन अचानक सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये येऊन बसले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी मु्ंब्रा येथे एक मोठा अपघात झाला होता, ज्याची अंतर्गत चौकशी सुरू होती, ज्यामध्ये दोन इंजिनिअर जे आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या युनियनने याला विरोध दर्शवला आहे. या इंजिनिअर विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या विरोधात तसेच आपल्या काही मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानं मोटर मॅन आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी मुंब्रामध्ये दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते, या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 9 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात अंतर्गत चौकशीनंतर दोन रेल्वे अभियंत्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.

रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेच्या दुरुस्तीचे काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं.  पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असतानाही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने झालेल्या या रेल्वे अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते. मोठ्या पावसानंतर रेल्वे रुळाचे किरकोळ काम करून वेल्डिंग न केल्याने दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते असा व्हिजेटीआयचा अहवाल आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...