मुंबईतील विसर्जन स्थळांची यादी, भरती ओहोटीच्या वेळा; गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या जनसंपर्क विभागातर्फे निर्मित ‘श्री गणेशोत्सव – 2021 माहिती पुस्तिके’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मुंबईतील विसर्जन स्थळांची यादी, भरती ओहोटीच्या वेळा; गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 8:06 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या जनसंपर्क विभागातर्फे निर्मित ‘श्री गणेशोत्सव – 2021 माहिती पुस्तिका’ चे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (4 सप्टेंबर) महानगरपालिकेच्‍या बाई य. ल. नायर रुग्णालय शतकपूर्ती सोहळ्याप्रसंगी करण्यात आले. (Publication of Ganeshotsav information booklet by Chief Minister Uddhav Thackeray)

राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्‍हा पालकमंत्री आदित्‍य ठाकरे, मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी, उपआयुक्त (परिमंडळ 2) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक हर्षद काळे, नगरसेवक, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार यंदा देखील या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.

यंदाच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगी अर्जाचा नमुना, सर्वसमावेश सुधारित मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गणेशोत्सव 2021 संदर्भात निर्गमित केलेले परिपत्रक, महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचे परिपत्रक, गणेशोत्सवात जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, महानगरपालिकेचे व इतर महत्त्वाचे नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, कृत्रिम विसर्जन तलावांची विभागवार यादी, सण आणि समारंभांसाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश या पुस्तिकेत आहे.

त्याचबरोबर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने, या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबत महत्त्वाची व जनजागृतीपर माहिती या पुस्तिकेत समाविष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांच्या कोविड विषयक नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

ही पुस्तिका महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in किंवा http://portal.mcgm.gov.in यावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

इतर बातम्या

Aurangabad Crime: ‘यासाठी दामलेच जबाबदार’ म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर

उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध?, बावनकुळेंचं मोठं विधान; राजकीय आखाडा तापणार

VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

(Publication of Ganeshotsav information booklet by Chief Minister Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.