जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस हा योगायोग नाही, हा तर ठरवून केलेला प्लान; राहुल शेवाळेंचा हल्लाबोल

जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस आली हा काही योगायोग नाही. हा ठरवून केलेला प्लान आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. (rahul shewale)

जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस हा योगायोग नाही, हा तर ठरवून केलेला प्लान; राहुल शेवाळेंचा हल्लाबोल
rahul shewale
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 4:01 PM

मुंबई: जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस आली हा काही योगायोग नाही. हा ठरवून केलेला प्लान आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. (rahul shewale slams bjp over ed notice to anil parab)

राहुल शेवाळे यांच्या हस्ते विलेपार्लेतील एका सलूनचं उद्घाटन करण्यात आलं. आर्मीतील जवान आणि पोलिसांसाठी उघडण्यात आलेलं हे मुंबईतील पहिलं सलून आहे. यावेळी शेवाळे यांनी मीडियाशी संवाद साधला. जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर नोटीस आलेली आहे. त्यामुळे हा योगायोग नाही. या बरोबर प्लानिंग करून केलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे लोकांना पण कळून चुकले की ED चा वापर आता केंद्र सरकार राजकारणासाठी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकच त्याचे प्रत्युत्तर देतील, असं शेवाळे म्हणाले.

आकस ठेवून कारवाई

जे केंद्र सरकारच्या माध्यमातून राजकारण चालू आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. केवळ शिवसेनेच्या प्रत्येक घडामोडीत परब यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शिवसेनेच्या कठिन काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा आकस भाजपच्या मनात आहे. त्यामुळेच भाजपचा त्यांच्यावरील राग दिसून येत आहे. म्हणूनच त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून नोटीस दिली बजावली आहे. ही लीगल प्रोसेस आहे आणि अनिल परब स्वतः ॲडव्होकेट आहेत. त्यांना ही सर्व लीगल प्रोसेस माहिती आहे. त्यामुळे त्या बाबतीत ते कायदेशीर लढाई पार पाडतील आणि विरोधकांना उत्तर देतील. अनिल परब दोषी नसल्याचं दिसून येईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मग केंद्राकडे मागणी करा

दहीहंडीच्या संदर्भात जे निर्बंध आहे ते केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लावण्यात आले आहेत. केंद्र सरकार जशा सूचना देते त्यानुसार राज्य सरकार या सूचनांची अंमलबजावणी करते. सण, उत्सव साजरे करू नका हे केंद्र सरकारनेच सांगितलं आहे. जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर राज्य सरकार त्याला अनुकूलता दर्शवेल. सण, उत्सवांवरील निर्बंध हटवायचे असतील तर विरोधकांनी तर खऱ्या अर्थाने केंद्राकडे परवानगी मागितली पाहिजे. कुठलाही अभ्यास न करता व कुठलीही माहिती न घेता हे लोक आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सर्व काही निवडणुकीसाठी

दहीहंडी उस्तव साजरा करावा, हिंदूंचे सण साजरे व्हावेत ही शिवसेनेची भूमिका आहे. पण कोरोनाची लाट येऊ नये म्हणून केंद्र सरकारची गाईडलाईन आहे. जनतेचे जीवित हानी होऊ नये यासाठी राज्य सरकारने हे निर्बंध लावले आहेत, असंही ते म्हणाले. सध्या जे आंदोलन सुरु आहे ते महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुरू आहे. पण लोकांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री जे काही निर्णय घेत आहे ते राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (rahul shewale slams bjp over ed notice to anil parab)

संबंधित बातम्या:

‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं आंदोलन नाही’, दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्र्यांचा मनसे, भाजपला टोला

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना नाव न घेता टोला

मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनात झेप, महाराष्ट्रात सर्वाधिक मानांकन, सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांची माहिती

(rahul shewale slams bjp over ed notice to anil parab)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.