AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारची कपटनीती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा: अरविंद सावंत

गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. | oxygen express of Maharashtra

केंद्र सरकारची कपटनीती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा: अरविंद सावंत
अरविंद सावंत आणि पियूष गोयल
| Updated on: Apr 21, 2021 | 2:59 PM
Share

मुंबई: देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण खेळत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन (Oxygen) आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने अजूनही फिरवत ठेवले आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला. (oxygen express of Maharashtra travelling delay due to Railway department says Arvind Sawant)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस 19 तारखेला निघाली तरी अजून काल रात्री 24 तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करुन दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही क्रूर आणि कपटनीती आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.

‘कोरोनाच्या संकटात भाजपचं गरिबांच्या जीवाशी खेळणारं राजकारण’

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरु आहे. हे राजकारण गरिबांच्या जीवाशी खेळणारं आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे. प्राण कंठाशी आले तरी रेल्वेमार्फत ऑक्सिजन पोहोचेल का माहिती नाही. भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते. मात्र, आता आम्ही फक्त 40 टक्केच ऑक्सिजन पुरवू शकतो, असे प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी हे सगळं सुरु आहे. कुडमुडे ज्योतिषी तारखांवर तारखा सांगत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

‘बंगालच्या निवडणुका झाल्यावर देशात लॉकडाऊन लागेल’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिथे ऑक्सिजनची समस्या असेल ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत. मात्र, अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

नाशिक पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती, 11 रुग्ण दगावल्याची भीती, 30 जण मृत्यूच्या दाढेत

(oxygen express of Maharashtra travelling delay due to Railway department says Arvind Sawant)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.