Marathi News » Photo gallery » Maharashtra nashik oxygen tanker leakage while tankers were being filled at dr zakir hussain hospital in nashik eleven patient died numbers may be increased
नाशिक पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती, 22 रुग्ण दगावले, अनेक जण मृत्यूच्या छायेत
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. (Maharashtra Nashik Oxygen tanker leakage)
राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची दुर्घटना घडली आहे.
1 / 9
या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
2 / 9
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली.
3 / 9
या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
4 / 9
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात जवळपास 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. सध्या या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे
5 / 9
नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव पाहणीसाठी घटनास्थळी आले
6 / 9
11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
7 / 9
ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.