
Raj Thackeray Big Statements: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवा भेट घेतली. ठाणे येथे शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे मनसे-उद्धव सेनेत मीठाचा खडा पडतोय अशा चर्चा सुरू झाल्या. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यानंतर या भेटीने चर्चांना हवा दिली. या भेटीबाबत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीवर मोठे भाष्य केले आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन
चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर एकमेकांना भेटायला नको का? प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. काल एकनाथ शिंदे यांना भेटलो. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन असे राज ठाकरे म्हणाले. आता तीन वर्षांनी निवडणुका आहेत. आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर भेटायला नको का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
निकोप राजकारण राहिलं नाही
आपल्याकडे निकोप राजकारण राहील नाही कोणाला भेटल की युत्या यावर सुरुवात होते प्रत्येक वेळेला काही शोधलच पाहिजे .रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. विकास म्हणजे रस्ते बांधणे म्हणजे नाही.ती सूज आहे.मूळ गोष्टीला हात घालत नाही. मुंबई ठाणे नाशिक येथे काम सुरू आहे.अनेकांकडे गाड्या आहेत त्या रस्त्यावर उभ्या राहतात.याला शिस्त राहिली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागील कारण काय?
अनेक इमारती मध्ये पार्किंग मधल्या गाड्या रस्त्यावर येतात.सगळीकडे जाम होऊन बसले आहे.शहरात येणारे मानस गाड्या येत आहे.मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो.त्यांनी भूषण गागाराणी यांनी सांगितलं.फुटपाथला लाल आणि काळा असं टाका चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर दंड या गोष्टी कानावर घातल्या. मी या गोष्टीसाठी गेलो होतो, त्यांना फाईल दिली, असे त्या भेटीचे कारण राज ठाकरे यांनी सांगितले.
शहराकडे येणार्या लोढ्यांवर भाष्य
शहराची रोजची स्थिती बिकट अन् भीषण अवस्थेला पोहचली आहे. शहरात येणारी माणसं थांबत नाहीत. सगळ्या गोष्टीचा विचका झाला आहे.या लोकांना आधार कार्ड,रेशन कार्ड कोण देत आपलीच माणसं देत आहेत त्यांच्यावर कधी कारवाही होणार? शहरात किती माणसं राहत आहेत. याचा विचार राज्यसरकार केंद्र सरकारने करावा. मी नागरिक म्हणून अध्यक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सांगण गरज आहे.यासाठी मी पुन्हा भेटेल.निकोप राजकारण पूर्वी होत. प्रत्येक गोष्ट तिरस्कारण पाहील जात. याने काही हाती लागणार नाही. सरकारला ठणकावलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.