दोन राज्यातील बंध मजबूत, त्यामुळे संघर्ष नकोच, राज ठाकरेंनी सीमावादावर उपायच सांगितला

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Dec 07, 2022 | 6:07 PM

महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद कर्नाटकमधील 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हा मुद्दा उखरून काढला जातो आहे.

दोन राज्यातील बंध मजबूत, त्यामुळे संघर्ष नकोच, राज ठाकरेंनी सीमावादावर उपायच सांगितला

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कर्नाटकला आणि कर्नाटकातून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना इशारा दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमु्ख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमावाद उफाळून यावा यासाठी कोणाकडून तरी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्नाटकातून कोण खतपाणी घालत आहे हे उघड असले तरी, महाराष्ट्रातून त्याला कोण खतपाणी घालत याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव भागातील मराठी बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कर्नाटक सरकारने थांबवावेत, महाराष्ट्रातील वाहनांची होणारी तोडफोड थांबवावी.

त्यातून हे प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी तोंडावर आवर घालावा असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद कर्नाटकमधील 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हा मुद्दा उखरून काढला जातो आहे.

मात्र त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सुटायला हवा असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

त्याबरोरच कर्नाटक जर आडमुठेपणाची भूमिका घेत असेल तर मनसे काय करू शकते ते मनसे सैनिकांनी दाखवलं आहे असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या सीमांवर चहूबाजूंनी दावा सांगितला जातो आहो. त्यामुळे महाराष्ट्राकडे वळणारी आणि येणारी बोटं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पिरगळली पाहिजेत असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

यावेळी पक्ष ही भूमिका विसरून आपण महाराष्ट्राचे आहोत अशा भूमिकेतून ही कृती करावी असंही त्यांनी सांगितले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सामोपचाराने हा वाद मिठवाव आणि तेच हिताचे आहे असंही त्यांनी सांगितले आहे. कारण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात एकजिनसीपणा आहे.

कर्नाटकातील लोकांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत, तर काहींची कुलदैवतही कर्नाटकात असल्याचे सांगत महाराष्ट्र-कर्नाटक मैत्र टिकवण्यातच हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI