Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचं महत्व वाढलं, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली बैठक

या जागेवर सध्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय. मात्र हे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होतील. मात्र शिवसेने ही जागा काबीज करण्यासाठी कंबर कसताना दिसून येत आहे.. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचं महत्व वाढलं, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलवली बैठक
मुख्यमंत्र्यांनी बोलावली अपक्ष आमदारांची बैठकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:36 PM

मुंबई : सध्या सहा जागांसाठी लवकरच राज्यसभेच्या निवडणुका (Rajyasabha Election) पार पडत आहेत. त्यामुळे आता त्या घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या खासदारांची (Rajya Sabha MP) संख्या ही सहा आहे. यात भाजपकडून दोन खासदार राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना (Shivsena) यांच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक जागा निवडून दिली जाणार आहे. तर एका जागेच गणित अजूनही कुणाच्या खात्यात जाणार हे ठरत नाही. या जागेवर सध्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय. मात्र हे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होतील. मात्र शिवसेने ही जागा काबीज करण्यासाठी कंबर कसताना दिसून येत आहे.. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

ही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. परवा सायंकाळी म्हणजेच शुक्रवारी वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांचे महत्व सध्या चागलेच वाढले आहे. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस होणार आहे.  महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेना लढणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यासाठी अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. तसेच मतदानावेळी अपक्ष आमदारांना व्हीपचे बंधन नाही, त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगदार होणार हे निश्चित झालंय.

कुणाला किती मतांची गरज?

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे तर भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत आता नवं ट्विस्ट आलंय.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंना कुणाचा पाठिंबा?

छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. तर अपक्षमधील काही आमदारांचा पाठिंबाही संभाजीराजेंना आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. मात्र ही निवडणूक अपक्ष लढण्यावर संभाजीराजे ठाम आहेत. त्यामुळे आगामी काळात भूमिका बदलणार की आहे त्या निर्णयावर ठाम राहणार यावरही ही निवडणूक अवलंबून असणार आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.