Rajyasabha Election : इगो बाजुला ठेऊन विचारलं असतं तर राज ठाकरेंनी विचार केला असता, मनसे आमदाराचा शिवसेनेला टोला

त्यांनी विनंती केली म्हणून त्यांना मान दिला. बाकी कोणी विनंतीच केली नाही, मागच्या वेळेस संभाजीराजांनी विनंती केली त्यांच्या नोमिनेशन फॉर्मवर सही केली, असे म्हणताना राजू पाटलांनी शिवसेनेलाही नाव न घेता टोला लगावला आहे. 

Rajyasabha Election : इगो बाजुला ठेऊन विचारलं असतं तर राज ठाकरेंनी विचार केला असता, मनसे आमदाराचा शिवसेनेला टोला
इगो बाजुला ठेऊन विचारलं असतं तर राज ठाकरेंनी विचार केला असता, मनसे आमदाराचा शिवसेनेला टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:17 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) मनसे (MNS) कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी शर्मिला वहिनींचा वाढदिवस होता म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो होतो, त्यावेळेला आशिष शेलार जे राज साहेबांचे मित्र आहेत तेही त्या ठिकाणी आले होते, त्यांनी साहेबांना विनंती केली तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल का म्हणून राज साहेबांनी त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विनंती केली म्हणून त्यांना मान दिला. बाकी कोणी विनंतीच केली नाही, मागच्या वेळेस संभाजीराजांनी विनंती केली त्यांच्या नोमिनेशन फॉर्मवर सही केली, असे म्हणताना राजू पाटलांनी शिवसेनेलाही नाव न घेता टोला लगावला आहे.

अबु आझमी आणि एमआयएमच्या मागे बीझी असतील

यावर बोलताना ते म्हणाले, काही लोक बाजुला ठेवून राज साहेबांना विचारले असते तर साहेबांनी तोही विचार केला असता, मात्र ते लोक एमआयएम आणि अबु आझमीच्या मागे बिझी असल्याने त्यांनी संपर्क केला नसेल, असा टोला त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी फोन केला, मात्र उद्या पाहू, मतदानाला जायच्या अगोदर राज साहेब फोन करणार आहेत, तेव्हा ते आदेश देतील तसे करून असेही राजू पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी सेनेला पाठिंबा दिला असता?

मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर काही आजचं नाही, राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडल्यापासून हे वैर सुरूच आहे. पहिल्यांदा सेना आणि भाजपची युती तुटल्यावरही मनसे भाजपच्या युतीच्या चर्चे होत्या, मात्र उद्धव ठाकरेंनी योग्य प्रतिसाद दिला नाही, असे राज ठाकरे उघडपणे सांगताना दिसून आले. मात्र त्यानंतर हे राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच गेलं. तसेच आता मागील काही दिवसांतलं राजकीय वातावरण आणि मनसेने हिंदूत्व आणि सत्तास्थापनेवरून शिवसेनेवर उडवलेली टिकेची झोड, तेसच भाजपच्या नेत्यांचं कौतुक पाहता आता मुख्यमंत्री पाठिंब्यासाठी विचारलं असतं तर राज ठाकरेंनी पाठिंबा दिला असा की नाही? याबाबत शंकाच आहे. आता सहाजिकच मनसेचं मत हे भाजपच्या पारड्यात पडणार आहे. मात्र एक मत हे कधी कधी संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलतं. त्यामुळे मनसेच्या एका मातचं वजनही या निवडणुकीत कळेलच.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.