झोपेचं इंजेक्शन देत महिलेवर बलात्कार, माहिम दर्ग्याचे ट्रस्टी निसार यांच्यावर गंभीर आरोप

माहिम दर्ग्याचे ट्रस्टी आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार यांच्याविरोधात माहिम पोलीस ठाण्यात कथित बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Rape case registered against Mahim Dargah trustee DR Mudassir Nisar)

झोपेचं इंजेक्शन देत महिलेवर बलात्कार, माहिम दर्ग्याचे ट्रस्टी निसार यांच्यावर गंभीर आरोप
चेतन पाटील

|

Jan 02, 2021 | 4:40 PM

मुंबई : माहिम दर्ग्याचे ट्रस्टी आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार यांच्याविरोधात माहिम पोलीस ठाण्यात कथित बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार यांच्याविरोधात कलम 376, 328 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (Rape case registered against Mahim Dargah trustee DR Mudassir Nisar).

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने डॉ. मुदस्सिर निसार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निसार यांनी एका 33 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी लग्नाचा शब्द मागे घेतला, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आता एफआयआर दाखल केला आहे.

डॉ. मुदस्सिर निसार यांनी पीडितेला झोपेचं इंजेक्शन देवून बलात्कार केला, असादेखील गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे (Rape case registered against Mahim Dargah trustee DR Mudassir Nisar).

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें