मुंबई रियल इस्टेट क्षेत्रात इतिहास घडला, 10 दिवसांत 3 हजार 95 घरांची विक्री!

31 डिसेंबर 2020 पर्यंत मुंबईत तब्बल 19 हजार घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई रियल इस्टेट क्षेत्रात इतिहास घडला, 10 दिवसांत 3 हजार 95 घरांची विक्री!

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचं उत्पन्नाचं साधन हिरावलं गेलं. त्यामुळे मुंबईसारख्या मायानगरीत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न अधुरं सोडून अनेकजण गावी परतले. पण पाय खोलात चाललेल्या रियल इस्टेस्ट क्षेत्राला पुन्हा चालना देण्यासाठी सरकारनं एक पाऊल उचललं आणि मुंबईतील रियल इस्टेट क्षेत्रानं नवा इतिहास रचला! गेल्या 10 दिवसांत तब्बल 3 हजार 95 घरांची विक्री झाल्याची माहिती डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अॅन्ड स्टॅप्मने दिली आहे.(3 thousand 95 houses sold in 10 days in Mumbai)

डबघाईला जात असलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला होता. ग्राहकांनी घर घरेदी करावी यासाठी स्टॅम्प ड्यूटी कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर बिल्डरांनाही मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे ग्राहक पुन्हा एकदा घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करु लागला आणि सरकारी योजनेचा फायदा त्यांनी घेतला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 31 डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 19 हजार घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

घर खरेदीसाठी मुंबईकरांची पसंती कुठे?

मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं. मात्र, मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईतील जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे. मात्र, तरीही मुंबईकरांची ओढ ही मुंबईतील घरांकडेच आहे. गेल्या तीन महिन्यात एकूण 6439 घरांची खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे. त्यामुळे अजूनही मुंबईकरांची पहिली पसंती ही जुन्या मुंबईलाच आहे. यामध्ये सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वाधिक झाली आहे. तीन महिन्यात 6439 घरांची खरेदी झाली आहे. त्याशिवाय, कुर्ला बोरीवलीलाही अधिक पसंती आहे.

मुंबईकरांची पसंती असलेल्या कुलाबा, सायनमध्ये जमिनीचा भाव काय?

कुलाबा – 55,000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट

सायन – 30,000 ते 50,000 हजार रुपये प्रति चौरस फूट

सायन आणि कुलाबादरम्यान – 30, 000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट

मुंबईत घरं 6 लाखांनी स्वस्त होणार

मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होण्याची आशा बळावली आहे.हा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क स्वत: भरायचे आहे. पण, निव्वळ प्रीमियम कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाल्यास मुंबईसारख्या शहरात सरासरी 6 लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात.

संबंधित बातम्या:

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

ठाकरे सरकारचे महत्त्वाचे 8 निर्णय; विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत मिळणार

3 thousand 95 houses sold in 10 days in Mumbai

Published On - 10:09 am, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI