कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात; भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

‘कोविन ऍप’मध्ये व संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात; भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात; भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे निर्देशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 6:30 PM

मुंबईः कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या (Covid preventive vaccine) दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ व्यक्तिंना दुसरी मात्रा घेतल्यानंतर 9 महिन्यांनी (39 आठवड्यांनी) प्रतिबंधात्मक मात्रा (Precuation Dose) (बूस्टर डोस / तिसरी मात्रा) देण्यात येत आहे. तथापि, विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास(International travel) करणे गरजेचे असणाऱ्या व्यक्तिंना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार आता याबाबत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार ज्या व्यक्तिंना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे आहे आणि ज्या देशात त्यांना जायचे आहे, त्या देशातील नियमांनुसार प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेली असणे गरजेचे आहे, अशा व्यक्तिंना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 90 दिवसांनी तिसरा डोस घेता येणार असल्याची माहिती एका विशेष पत्राद्वारे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कळविण्यात आले असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

वैद्यकीय उपचार क्रमानुसार

तपशिलानुसार ‘कोविन ऍप’मध्ये व संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर लशीची मात्रा देण्याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी सुयोग्यप्रकारे करणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची सूचना

तरी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येत आहेत.

खासगी लसीकरण केंद्रावर सुविधा

आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी व वय वर्षे 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल‌. तसेच 18 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असणार आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक मात्रा वेळच्यावेळी घेण्याचे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.