मुंबई : सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी (Maharashtra Floods) अवघा महाराष्ट्र सरसावला आहे. स्थानिक लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh deshmukh) पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत केली. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM Relief Fund) रितेशने 25 लाखांचा चेक सुपूर्द केला आहे. यावेळी त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) त्याच्यासोबत होती.