मुंबई महापालिकेत रिपाइंचे 25 नगरसेवक निवडून आणा; आठवलेंनी सांगितला भाजपसोबतच्या युतीचा फॉर्म्युला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 09, 2021 | 7:37 PM

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच रिपब्लिकन पक्षानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेत रिपाइंचे 25 नगरसेवक निवडून आणा; आठवलेंनी सांगितला भाजपसोबतच्या युतीचा फॉर्म्युला
ramdas athawale
Follow us

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच रिपब्लिकन पक्षानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागण्याचे आवाहन रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.

रिपाइंने विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केलं. ईशान्य मुंबईत 1992 च्या पालिका निवडणुकीत 7 नगरसेवक रिपाइंचे निवडून आले होते. तर संपूर्ण मुंबईत रिपाइंचे 12 नगरसेवक त्याकाळात निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे. झोडपट्टीवासीयांचे गरिबांचे नोकरीचे घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीच वर्षे रिपाइंचा उपमहापौर तर भाजपचा महापौर होईल. तसेच नंतरची अडीच वर्षे रिपाइंचा महापौर होईल, असे भाजप सोबत ठरले असल्याचे आठवले यांनी यावेळी जाहीर केले.

कामाला लागा

या महापालिका निवडणुकीत रिपाइंचे 236 नगरसेवकांपैकी 25 नगरसेवक निवडून आले पाहिजेत. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, आयोजक स्थानिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड, श्रीकांत भालेराव, डी एम चव्हाण, मुस्ताक बाबा, योगेश शिलवंत, राजेश सरकार, विलास तायडे, सुमित वजाळे, जयंतीभाई गडा, साहेबराव सुरवाडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

उत्तर भारतीयांना उमेदवारी देणार

मुंबईतील उत्तर भारतीयांच्या संकटात रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे. उत्तर भारतीयांचे रोजगार, घर आदी सर्व प्रश्नांवर नेहमी रिपब्लिकन पक्षाने संघर्ष केला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून आरपीआय उत्तर भारतीयांनाही मुंबई मनपा निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केले.

जिल्हानिहाय मेळाव्याचा धडाका

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हानिहाय मेळावे मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. आज ईशान्य मुंबईचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भीम छाया सांस्कृतिक केंद्र, सांताक्रूझ पूर्व येथे उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तसेच 13 डिसेंबर रोजी रिपाइंचा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा मेळावा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यांना रामदास आठवले, अविनाश महातेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO: बिपीन रावत यांच्या अपघाताचा तो व्हिडिओ खरा; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : बॉलिवूडची सुपरस्टार जोडी अखेर लग्नबंधनात, विकी-कतरीनाने घेतले सात फेरे

Farmer Protest : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत, आश्वासनांची पूर्तता लवकर करा, पटोलेंची मागणी

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI