Sachin Vaze Case : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर पुस्तक लिहिण्यासाठी सगळा कट?

| Updated on: Mar 20, 2021 | 6:32 PM

पुस्तक लिहिण्यासाठीच हा कट रचला होता, अनुभव घ्यायचा होता, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझे यांनी केल्याचं समजतंय.

Sachin Vaze Case : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर पुस्तक लिहिण्यासाठी सगळा कट?
सचिन वाझेच्या वापरातील आऊटलँडर गाडी एनआयएकडून जप्त
Follow us on

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. एनआयएकडून सुरु असलेल्या चौकशीत सचिन वाझे यांनी नवी माहिती दिल्याचं कळतंय. जम्मू – काश्मीरच्या दहशतवादावर एक पुस्तक लिहिणार होतो, अशी कबुली सचिन वाझे यांनी एएनआयला दिल्याचं समजतंय. पुस्तक लिहिण्यासाठीच हा कट रचला होता, अनुभव घ्यायचा होता, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझे यांनी केल्याचं समजतंय.(Sachin Waze confesses to plotting to write book on terrorism in Jammu and Kashmir)

सचिन वाझे काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरच्या दहशतवादावर एक पुस्तक लिहिणार होतो, अशी कबुली सचिन वाझे यांनी एएनआयला दिल्याचं कळतंय. पुस्तक लिहिण्यासाठी हा सगळा कट रचला होता. अनुभव घ्यायचा होता. एनआयए या प्रकरणी कसा तपास करतेय, हे या पुस्तकात नमूद करायचं होतं, अशी नवी माहिती आता सचिन वाझे यांनी दिली असल्याचं एनआयए सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यावर जिंकून हरलेली लढाई हे पुस्तक लिहिलं आहे. वाझे यांनी शिना बोरा आणि डेविड हेडली प्रकरणावरही पुस्तक लिहिल्याची माहिती मिळत आहे.

वाझे हे निलंबित असताना 2016 मध्ये काश्मीर घाटीच्या यात्रेवर गेलेल होते. तिथे त्यांनी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह जम्मू-काश्मीरच्या एका पोलिस अधिकाऱ्याची भेट घेतली होती. तिथे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील मिलिटन्सीबाबत चर्चा केली होती. तेव्हा वाझे यांनी आपण एक पुस्तक लिहित असल्याचा दावा केला होता. त्यासाठी ही माहिती गोळा करत असल्याचं वाझेंनी त्यांना सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हिरेन, वाझे सीएसएमटीला भेटले होते!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुसख हिरेन सीएसटीला गेले होते. तिथे ते कुणाला भेटले या विषयचा गुंता आता सुटणार आहे. 17 फेब्रुवारी स्कॉर्पिओ मुलुंड-ऐरोली रोडवर खराब झाल्याने हिरेन हे ओला कॅबमधून दक्षिण मुंबईत आले होते. त्याच दिवशी वाझेही मुंबई पोलीस मुख्यालयात आले होते. मुख्यालय सोडल्यानंतर रहदारी सिग्नलवर सीएसएमटीच्या बाहेर थांबली होती. सिग्नल हिरवा होता. परंतु मर्सिडीत पुढे गेली नाही. वाझेंनी पार्किंग लाईट सुरू केली. रस्त्याच्याकडेला जीपीओसमोर ही मर्सिडीज पार्क करण्यात आली होती. ही रस्ता ओलांडून हिरेन मर्सिडीज जवळ आले. त्यावेळी हिरेन आणि वाझे यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यावेळी हिरेन यांनी त्यावेळी वाझेंना स्कॉर्पिओची चावी दिली होती का? याचा तपास एनआयएने सुरू केला आहे.

कोण आहेत मनसुख हिरेन?

मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय 43 वर्षे. तीनही मुलांची वय हे 13 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते 2005 सालापासून रहात आहेत.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

वागळेची नाही, वाझेंची चक्रावून टाकणारी दुनिया; बघा काय काय ‘उद्योग’ केलेत एन्काऊंटर स्पेशालिस्टने?

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

Sachin Waze confesses to plotting to write book on terrorism in Jammu and Kashmir