सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक : सदाभाऊ खोत

विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. याच गोष्टीचा धागा पकडत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली.

सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक : सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 8:42 AM

मुंबई : “महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे”, असा घणाघात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली.

“एखाद्या राजकीय पक्षानं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करु, असं जाहीरनाम्यामध्ये म्हटलं असेल तर त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे. कारण त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की, तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ, तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असं जर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं असतं तर लोकांनीदेखील ठरवलं असतं की कुणाच्या बाजूने जायचं ते”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

“निवडणूक आयोगाने याची दक्षता घ्यावी. आम्ही ही मागणी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. जे पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये छापतात आणि निवडून आल्यानंतर त्याची जर ते अंमलबजावणी करणार नसतील तर अशा पक्षांची नोंदणी रद्द केली गेली पाहिजे, कारण यांनी जनतेची फसवणूक केली आहे”, असंदेखील सदाभाऊ खोत म्हणाले.

“जे पक्ष निवडणुकीपूर्वी जाहीरनामे प्रसिद्ध करतात. त्या जाहीरनाम्यांना संमती द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असायला हवेत. निवडणूक आयोगाने खरंतर तसं धोरणच सुरु करायला हवं. निवडणुकीच्यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करायचा, त्या जाहीरनाम्यात काहीही आश्वासनं देऊन आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं, या गोष्टीचा राजकारणावरही विपरीत परिणाम होतो” असं सदाभाऊ खोत म्हणाले.

Non Stop LIVE Update
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.