सर्वात मोठी बातमी ! शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; किरीट सोमय्या यांची माहिती

याप्रकरणात कदम यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तसेच अनिल परब यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरीही छापे मारण्यात आले होते.

सर्वात मोठी बातमी ! शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; किरीट सोमय्या यांची माहिती
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 8:13 PM

मुंबई : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी ईडीच्या पथकाने सदानंद परब यांची दापोलीतील त्यांच्या कुडेशी या गावी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं असून सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. कदम यांना ताब्यात घेण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कदम यांच्या नावाचा वापर

याप्रकरणात कदम यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तसेच अनिल परब यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरीही छापे मारण्यात आले होते. साई रिसॉर्टचं खरेदी विक्री प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे.

हिशोब तर द्यावाच लागेल

आपल्या बोली भाषेत ताब्यात घेणं आणि अटक करणं हा टेक्निकल शब्दांचा खेळ आहे. एखाद्याला ताब्यात घेतल्यानंतर अटक करणं आणि कोर्टात नेणं हा ईडीचा भाग आहे. एकदा कोर्टात प्रकरण गेलं की तो कोर्टाचा भाग होतो. आता सदानंद कदम आणि अनिल परब यांचे आणखी घोटाळे बाहेर येतील. साई रिसॉर्ट हा एक घोटाळा आहे. केबलचा अजून घोटाळा आहे. केबल घोटाळ्यात किती खंडणी मागितली त्याचा आकडा आल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल. त्यांना हिशोब तर द्यावाच लागेल, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. दापोलीत साई रिसोर्ट घोटाळा झाला. ईडीने सदानंद परब यांना अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.