Salman Khan हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदू , नितेश राणे यांनी पुन्हा डिवचले, राज ठाकरेंवर ती घणाघाती टीका

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray: मंत्री नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे यांना मोठा टोला लगावला. तर राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

Salman Khan हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदू , नितेश राणे यांनी पुन्हा डिवचले, राज ठाकरेंवर ती घणाघाती टीका
सलमान हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदू
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 10, 2026 | 1:34 PM

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray: मंत्री नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम इथं कार्यक्रम झाला. त्यात सलमान खान याच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमावरून नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना मोठा टोला लगावला आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतरही त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू निघाला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडीलांना हिंदूहृदयसम्राट देखील बोलू शकत नाहीत, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. रटाळ प्रवचनात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली असती. योग्य दिशा राज ठाकरेंना मिळाली असती आले असते तर रटाळ बोलण्यापेक्षा बैद्धिक घेतलं असतं तर इतकी लोकं सोडून गेले नसते, नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

राज ठाकरेंवर राणेंचा निशाणा

त्यांना जी माहिती मिळाली ती चुकीची असावी असं मला वाटत आहे. राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून संघाच्या कार्यक्रमाला यायला हवं होत असं माझं मत आहे. बौद्धिक ऐकून पक्ष कसा चालवायचा याच ज्ञान मिळालं असतं, असा खोचक टोला राणेंनी राज ठाकरेंना लगावला. मालेगावात जाऊन राज ठाकरे हे काय नाही बोलले. मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं, हिंदू आणि हिंदुत्ववार बोलायचं, पाकिस्तानातील अब्बांना खूष करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

सलमान खान हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदु आहे असं माझं मत आहे. राज ठाकरे संघाच्या कार्यक्रमावर बोलण्याची हिम्मत दाखवत आहेत पण मौलवी यांच्यावर बोलण्याची हिम्मत नाही. मुंब्रावर बोलण्याची हिम्मत राज ठाकरे यांनी दाखवावी असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.

आम्हाला एक नंबरवर राहण्याची सवय

आता एक नंबरवर राहण्याची आम्हाला सवय झाली आहे. लोकसभा,विधानसभा,नगरपालिका निवडणुकीत फेव्हिकॉल का जोड महायुतीचा झालाय. कोकण हा भाजप आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे असे मोठे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. सिंधुदुर्गात उबाठाला ३, औषधाला ठेवलं आहे. जनतेनं विश्वास दाखवला आहे, जनतेनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यात कृतीतून आता व्यक्त करू. मुंबई एमआयएमला त्यांच्या पेक्षा अधिक जागा आहेत, हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला ठोकर मारली आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरेसेनेला लगावला.